सोने व चांदीत प्रत्येकी ५०० रुपयांची घसरण, दोन दिवसात सोने ८०० रुपयांनी घसरले
By विजय.सैतवाल | Updated: July 9, 2024 23:12 IST2024-07-09T23:11:52+5:302024-07-09T23:12:18+5:30
मंगळवारी सोने भावही ५०० रुपयांनी कमी होऊन ते ७२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. दोन दिवसात सोने तर ८०० रुपयांनी घसरले आहे.

सोने व चांदीत प्रत्येकी ५०० रुपयांची घसरण, दोन दिवसात सोने ८०० रुपयांनी घसरले
जळगाव : सोमवारी एक हजार ५०० रुपयांची भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात मंगळवारी (९ जुलै) ५०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ९२ हजार रुपये प्रति किलोवर आली. मंगळवारी सोने भावही ५०० रुपयांनी कमी होऊन ते ७२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले. दोन दिवसात सोने तर ८०० रुपयांनी घसरले आहे.
मे-जून महिन्यापर्यंतचा लग्नसराईचा काळ संपल्यानंतर जुलै ते सप्टेंबर या महिन्यात सोने-चांदीचे भाव कमी होतात. मात्र गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे मंदीच्या या काळातही अनेक वेळा सोने-चांदीचे भाव वाढलेले आहे. यंदाही ८ जुलै रोजी चांदीचे भाव एक हजार ५०० रुपयांनी वाढले होते. त्यामुळे चांदी ९२ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (९ जुलै) ५०० रुपयांची घसरण झाली.
दुसरीकडे दोन दिवसांपासून सोन्याचेही भाव कमी होत आहे. ६ व ७ जुलै रोजी ७३ हजार ६०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ८ जुलै रोजी ३०० रुपयांची तर ९ रोजी ५०० रुपयांची अशी दोन दिवसात ८०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ७२ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर आले.