सोने चोरी प्रकरण; तेलंगणाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:31 AM2018-11-20T00:31:50+5:302018-11-20T00:32:46+5:30

सोने-चांदी चोरीचे दागिने जालन्यातील काही व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यावरून तेलंगणातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तीन दिवसांपासून शहरात आहे.

Gold theft case; Filing of local crime branch team of Telangana | सोने चोरी प्रकरण; तेलंगणाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सोने चोरी प्रकरण; तेलंगणाचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सोने-चांदी चोरीचे दागिने जालन्यातील काही व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यावरून तेलंगणातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तीन दिवसांपासून शहरात आहे. या पथकाने शहरातील काही व्यापा-यांची चौकशी सुरु केली.
तेलंगणात जालना शहरातील एका महिलेने सोन्या-चांदीच्या दागिन्याची चोरी केली. या घटनांमधील एका महिला आरोपीला तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चोरुन आणलेले हे सोने त्या ठिकाणी न विकता ते दागिने जालन्यातील काही व्यापा-यांना विकले असल्याची माहिती त्या महिलेने दिली. या माहितीवरुन तेलंगणा पोलिसांनी जालन्यातील सोने-चांदीच्या काही व्यापा-यांच्या ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. ही कारवाई तीन दिवसांपासून सुरु आहे. यात पोलिसांनी व्यापा-यांकडून जवळपास १ किलो सोने जप्त केल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

Web Title: Gold theft case; Filing of local crime branch team of Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.