तलवारीने वार करून सोने व्यापाऱ्याला लुटले; पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 08:06 PM2019-05-27T20:06:52+5:302019-05-27T20:08:17+5:30

दरोडेखोरांनी सोने -चांदीच्या दागिन्यांसह ११ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला

The gold trader robbed in Jalana; Police publishes sketch of accused | तलवारीने वार करून सोने व्यापाऱ्याला लुटले; पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

तलवारीने वार करून सोने व्यापाऱ्याला लुटले; पोलिसांकडून आरोपींचे स्केच जाहीर

googlenewsNext

जालना : सोने व्यापाऱ्याच्या कारचा वीस किमी अंतरावरुन पाठलाग करुन तलवारीने वार करुन ११ लाख ५३ हजार रुपयांना लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जालना - राजूर रोडवर घडली. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी पोलीस संशयीत आरोपींचे स्क्रेच सोमवारी (दि.२७ ) जाहीर केले. 

जालना शहरातील विनय बाफणा यांचे राजूर येथे सोन्याचे दुकान असून, ते त्यांचा मुलगा नवनीत यांच्यासह जालना येथून राजूरला नियमित ये-जा करतात. या ठिकाणी त्यांची सोन्या - चांदीची दुकान आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता दुकान बंद करुन  ते जालन्याकडे येत होते. या दरम्यान त्यांनी राजूर येथील चौफुली सोडल्यानंतर त्यांच्या कारच्या समोरुन एक तर मागच्या बाजूने एक अशा दोन कारने त्यांच्यावर पाळत ठेवली. या तिन्ही कार जवळपास वीस किमी अंतरावर आल्यानंतर घाणेवाडी फाट्याच्या शिवारातील पुलावर समोरील कारने ब्रेक लावले, तर मागच्या कारने बाफणा यांच्या कारला मागच्या बाजूने धडक दिली. 

यावेळी दोन्ही कारमधून तीन ते चार जण हातात तलवार व बंदुक घेऊन उतरली. बाफणा यांच्या कडे येत त्यांनी ऐवज देण्याची मागणी केली. विरोध केल्यानंतर बाफणा यांच्या हातावर तलवारीने वार केले तर मुलगा नवनीत यालाही जखमी केले.  यावेळी  बाफणा यांच्या कारच्या काचा फोडून दरोडेखोरांनी सोने -चांदीच्या दागिन्यांसह ११ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  याप्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांना या दरोडेखारांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी आता चार संशियातांचे स्केच जाहीर केले आहेत. 

आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान
फिर्यादीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी चार आरोपीचे स्क्रेच तयार केले आहे. सदर संशयीत आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी नसल्याचे पोलीस सांगत आहे. यामुळे या दरोड्यातील आरोपींना पकडणे हे पोलिसांसमोर एक आव्हाण उभे आहे. दरम्यान, पोलिसांनी सदर आरोपींचा   जालना जिल्ह्यासह परभणी, बीड, औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा, हिंगोली येथेही पोलीस पथकाद्वारे शोध घेण्यात येत असल्याचे चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाले यांनी सांगितले.

Web Title: The gold trader robbed in Jalana; Police publishes sketch of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.