स्पर्धेतून चांगला भाव मिळेल : सभापती खोतकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:33 AM2021-09-23T04:33:43+5:302021-09-23T04:33:43+5:30

जालना : भुईमूगाचे उत्पादन यंदा वाढले असून चांगला भाव मिळाला पाहिजे या हेतूने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे ...

Good price will come from the competition: Speaker Khotkar | स्पर्धेतून चांगला भाव मिळेल : सभापती खोतकर

स्पर्धेतून चांगला भाव मिळेल : सभापती खोतकर

Next

जालना : भुईमूगाचे उत्पादन यंदा वाढले असून चांगला भाव मिळाला पाहिजे या हेतूने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे पूर्वी भाजी व किरकोळ मार्केटमध्ये विक्री होणाऱ्या भुईमूगासाठी भुसार मार्केट परिसरात विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांनी भुईमूग भुसार मार्केट मध्ये विक्रीस आणावे, असे आवाहन सभापती अर्जुन खोतकर यांनी केले आहे.

अधिक माहिती देताना खोतकर म्हणाले, खरीप हंगामातील लवकर उत्पन्न देणारे पीक म्हणून भुईमूग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असतो. बाजार समितीत उलाढाल ही सुरू राहते. मध्यंतरी उत्पादन घटल्याने भुसार मार्केट ऐवजी भाजी व किरकोळ मार्केटमध्ये भुईमूग विक्री होत होती. तथापि यंदा उत्पादनात वाढ झाली. हे लक्षात घेऊन भुसार मार्केट विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. येथे मोठे खरेदीदार असून स्पर्धा निर्माण होऊन चांगला भाव मिळेल. या दृष्टीने बाजार समितीने सदर निर्णय घेतल्याचे सांगून शेतकऱ्यांनी भुसार मार्केटमध्ये भुईमूग विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सभापती अर्जुन खोतकर, उपसभापती भास्करराव दानवे, सचिव रजनीकांत इंगळे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.

Web Title: Good price will come from the competition: Speaker Khotkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.