हिवाळ्यातही दर्जेदार आंब्याचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:27 AM2018-11-02T00:27:35+5:302018-11-02T00:28:00+5:30
आपल्याकडे आंब्याचे उत्पादन हे सहजासहजी नेहमी उन्हाळ्यात येते. परंतु जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील प्रगतीशील शेतकरी छायाबाई मोरे यांनी पुढाकार घेत, ऐन हिवाळ्यातही आंब्याचे उत्पादन घेतले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आपल्याकडे आंब्याचे उत्पादन हे सहजासहजी नेहमी उन्हाळ्यात येते. परंतु जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील प्रगतीशील शेतकरी छायाबाई मोरे यांनी पुढाकार घेत, ऐन हिवाळ्यातही आंब्याचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी गुरूवारी आंब्याची एक पेटी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना भेट दिली.
गोलापांगरी येथील प्रगतीशील शेतकरी छायाबाई मोरे यांनी यापूर्वी शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीचे उत्पादन हे वेगवेगळ्या रंगांमध्ये यशस्वीपणे घेतले होते. त्यांच्या ढोबळी मिरचिला मुंबई, पुणे, औरंगाबाद येथील फाईव्हस्टार हॉटेलमधूनही मोठी मागणी आहे. त्यांच्या शेतात त्यांनी आंब्याच्या माध्यमातूनही दर्जेदार उत्पादन घेतले असून, त्यांनी आंब्यामध्ये स्वत: संशोधन करून हिवाळ्यातही ‘केशव’ आंबा उत्पादन काढले आहे. त्यांच्याकडील एका आंब्याच्या झाडाला साधारपणे ५३० आंबे लगडले असल्याची माहिती त्यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना दिली.
यावेळी छायाबाई मोरे यांचे पती डी.के. मोरे, संतोष मोहिते, यांची उपस्थिती होती. यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांची नेहमी मदत होत असल्याचे छायाबाई मोरे यांनी सांगितले.