दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:36 AM2019-05-15T00:36:28+5:302019-05-15T00:37:43+5:30
नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील नूतन वसाहत येथील एका कॉम्प्युटर दुकान आणि घराला लागलेल्या आगीत कॉम्प्युटर, दुचाकी आणि इतर संसारोपयोगी साहित्य असा तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
राजेंद्र सिताराम आटोळे यांच्या मालकीचा गाळा अरविंद गोविंदराव बोराडे यांनी किरायाने घेऊन साई कॉम्युटर या नावाने दुकान थाटले होते. सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागून दुकानातील कॉम्युटर, प्रिंटर्स, स्पीकर, फर्निचर, लॅब आदी तसेच घरामालक आटोळे यांच्या घरातील दुचाकी आणि इतर साहित्य जळाले असा अंदाजे तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळाला.
रात्री अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. नागरिकांनी सुरुवातील आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व इलेक्ट्रिकचे साहित्य असल्याने आगीने रोद्र रुप धारण केले होते. यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
दोन बंबाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
जालना सजाचे तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अंदाजे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.