घनसावंगीत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:02 AM2018-05-24T01:02:10+5:302018-05-24T01:02:10+5:30

घनसावंगी येथील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी नगरपंचायत सभागृहात बिनविरोध पार पडली.

Gossip President, Vice President uncontested | घनसावंगीत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

घनसावंगीत अध्यक्ष, उपाध्यक्ष बिनविरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : येथील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी नगरपंचायत सभागृहात बिनविरोध पार पडली.
नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता राजेंद्र देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात होती. सभागृहात १७ पैकी १५ सदस्य हजर होते. तर शिवसेनेच्या मीराबाई देशमुख व भाजपचे फय्याजखा पठाण हे गैरहजर राहिले. नगराध्यक्षपदासाठी प्राजक्ता देशमुख यांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संगीता सानप यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांना तहसीलदार अश्विनी डमरे यांनी सहकार्य केले.
हे पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. राजेश टोपे यांनी देशमुख यांना उमेदवारी दिली होती. मात्र, उपनगराध्यक्षपदासाठी आ. राजेश टोपे कुणाला संधी मिळणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. आ. टोपे यांनी या पदासाठी बंद लिफाफ्यात नाव पाठविले. पहिल्या वर्षासाठी उपनगराध्यक्षपदासाठी सलीमाबी सय्यद गफूर यांची निवड करण्यात आल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड यांनी सांगितले. निवडणुकीसाठी सभापती रघुनाथ तौर, तात्यासाहेब चिमणे, मधुकर देशमुख, संभाजी देशमुख, बाळासाहेब जाधव, कल्याण सपाटे, भास्कर गाढवे, राजेश कोल्हे, पंडित धांडगे, भागवत रक्ताटे, तुषार पवार, रामदास घोगर यांनी पुढाकार घेतला. नगरसेवक गणेश हिवाळे, विलास गायकवाड यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: Gossip President, Vice President uncontested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.