सुवर्णपदक विजेत्या करण साळोकचा माहोरा ग्रामपंचायतीकडून सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:38 AM2018-12-17T00:38:05+5:302018-12-17T00:38:50+5:30

जाफराबाद तालुक्यांतील माहोरा येथील ग्रामपंचायतकडून रांची (झारखंड ) येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील करण साळोकने सुवर्णपदक मिळविले आहे.

Gram Panchayat felicitated gold medalist Karan Salok | सुवर्णपदक विजेत्या करण साळोकचा माहोरा ग्रामपंचायतीकडून सत्कार

सुवर्णपदक विजेत्या करण साळोकचा माहोरा ग्रामपंचायतीकडून सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
माहोरा : जाफराबाद तालुक्यांतील माहोरा येथील ग्रामपंचायतकडून रांची (झारखंड ) येथे पार पडलेल्या शालेय राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील करण साळोकने सुवर्णपदक मिळविले आहे. त्याची खेलो इंडियामध्ये निवड, झाल्याने सत्कार करण्यात आल्याने तो भारावून गेला होता.
या सत्कार सोहळ्यास रामेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन विजय परिहार, पंचायत समिती सभापती साहेबराव कानडजे, सरपंच वैशाली कासोद , मुख्याध्यापक सुधीर लकडे , प्रशिक्षक प्रकाश दुसेजा, जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे यांच्यासह जि.प.चे उपमुख्याधिकारी मुकीम देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत राहून करणने जे यश मिळविले ते निश्चितच गावातील अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. यावेळी करणेच आई-वडिलही सत्कार सोहळ्यास उपसिथत होते.
यावेळी करण साळोकने सांगितले की, शाळेतील सर्व शिक्षक तसेच दुसेजांनी जी मदत केली त्यातुळेच मला हे यश मिळाले. एकूणच दुसेजांनी दिलेल्या सूचनांचा मी खेळताना अंमल केला. भविष्यातही देशासाठी आणखी चांगली कामगिरी करण्याचा मानस करणने व्यक्त केला. तसेच माझा सत्कार माझ्या गावात होत असल्याने त्याचे मोठे कौतुक असल्याचे तो म्हणाला.
यावेळी मुकीम देशमुख तसेच परिहार, दुसेजा यांनी देखील यावेळी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप देठे, दिलीप सपकाळ यांनी केले. प्रास्ताविक श्रीकृष्ण चेके यांनी केले. आभार पाटील यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए .डी. पवार, शेवाळे, मळेकर, लहाने, वामनराव सोनवने, जे.एम . सोनवने, सोळंके, जाधव, फुसे, भालेकर, दांडगे, अन्य शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केला.

Web Title: Gram Panchayat felicitated gold medalist Karan Salok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.