Grampanchayat: परतूर तालुक्यातील सर्वात मोठ्या आष्टी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:04 PM2022-12-20T12:04:22+5:302022-12-20T12:05:29+5:30
भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांचे मुळ गाव असलेल्या लोणी ग्रामपंचायतीवरही भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले.
- शेषराव वायाळ/ विष्णू सोळुंके
परतूर: तालुक्यात ३९ ग्रामपंचायतीसाठी रविवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी सकाळी आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयात सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आष्टी ग्रामपंचापयतीचा निकाल लागला. यात भाजप पुरस्कृत पॅनलने विजय खेचला.
तसेच भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर यांचे मुळ गाव असलेल्या लोणी ग्रामपंचायतीवरही भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले. तहसीलदार रूपा चित्रक यांच्या उपस्थितीत परतूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्यात येत आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
निकाल ऐकण्यासाठी विद्यालयाच्या बाहेर उमदेवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली असून, गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठीपोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे. लोणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाच्या गजानन लोणीकर यांचा तर आष्टीच्या सरपंचपदी शोभा मोरे यांना जनतेने कौल दिला आहे.