ग्रासरुट इनोव्हेटर : ठिबकच्या नळ्या गुंडाळण्यासाठी शेतकऱ्याने विकसित केले वाइंडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:11 PM2018-11-19T12:11:51+5:302018-11-19T12:12:03+5:30

ठिबकच्या प्लास्टिकच्या नळ्या गुंडाळून ठेवण्यासाठी मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागते.

Grassroot Innovator: Farmer developed Winder for clutches of drip tubes | ग्रासरुट इनोव्हेटर : ठिबकच्या नळ्या गुंडाळण्यासाठी शेतकऱ्याने विकसित केले वाइंडर

ग्रासरुट इनोव्हेटर : ठिबकच्या नळ्या गुंडाळण्यासाठी शेतकऱ्याने विकसित केले वाइंडर

googlenewsNext

- गजानन वानखडे  (जालना)

सद्य:स्थितीत पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचनाला मोठे महत्त्व दिले जात आहेत. प्लास्टिक नळांच्या माध्यमातून पिकांना आवश्यक तेवढे पाणी देण्याचे तंत्र विकसित झाले आहे. दरम्यान, हे तंत्र विकसित झाले असले तरी ठिबकच्या प्लास्टिकच्या नळ्या गुंडाळून ठेवण्यासाठी मोठी कसरत शेतकऱ्यांना करावी लागते. त्यामध्ये या नळीला अढी पडून भविष्यात पुन्हा ही नळी अंथरतांना ती जागोजागी तुटते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो.

ही बाब लक्षात घेऊन जालना तालुक्यातील अंतरवाला येथील शेतकरी गणेश पंडितराव पडूळ या शेतकऱ्याने वाइंडिंग यंत्र तयार केले आहे. या यंत्रामध्ये बेरिंगचा वापर करण्यात आला असून, त्यासाठी तीन ते साडेतीन फुटाचे स्टॅण्ड बनवून त्यावर शेतातील ठीबकच्या प्लास्टिकच्या नळ्या सुलभ पद्धतीने गुंडाळून ठेवता येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी स्वत: विकसित केलेल्या या यंत्राला महाराष्ट्रासह आता आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातूनही मोठी मागणी येत असल्याची माहिती गणेश पडूळ यांनी दिली.

यापुढे ठिबक सिंचनाच्या प्लास्टिक नळ्यांचा दर्जा कायम राहून भविष्यात पुन्हा जैसे थे नळ्या अंथरता येतात. एक वाइंडरला २०० मीटरपेक्षा अधिक ठिबकच्या नळ्या गुंडाळून ठेवता येतात. हे तयार झालेले बंडल शेतकरी झाडाला अथवा स्वतंत्र खोलीत ठेवून त्याची निगा राखतो. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या गणेश पडूळ यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणाऱ्या या वाइंडरचे डिझाईन स्वकल्पनेतून तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेती करताना या यंत्राचा उपयोग विक्रीसाठी होत असल्याने त्यातूनही खिशात पैसा मिळत असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: Grassroot Innovator: Farmer developed Winder for clutches of drip tubes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.