‘गाळयुक्त शिवार’तून शेतकऱ्यांना समृद्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 05:14 AM2017-05-14T05:14:14+5:302017-05-14T05:14:14+5:30
गाव-शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गाव शिवारात थांबला पाहिजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद (जि. जालना) : गाव-शिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गाव शिवारात थांबला पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे ठरविले आहे. शेतीसाठी गाळ हा सकस आहार व वरदान ठरणार आहे. गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाचा त्यांनी प्रारंभ केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, आ. संतोष दानवे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पूर्वीच्या शासनकर्त्यांनी केवळ विभाग स्तरावर आढावा बैठका घेऊन विकास कामांकडे दुर्लक्ष केले. गेल्या सरकारच्या अपयशामुळे मानवनिर्मित दुष्काळ ओढवून घेतला. ते अपयश पुसून टाकण्याचे काम आम्ही सुरू केले आहे.