जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:33 AM2017-12-13T00:33:58+5:302017-12-13T00:34:02+5:30

जालना-वडीगोद्री रस्त्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, यासाठी ३३७ कोटींंचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Green signal to Jalna-Vadigodari roadwork | जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम मार्गी

जालना-वडीगोद्री रस्त्याचे काम मार्गी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना-वडीगोद्री रस्त्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला असून, यासाठी ३३७ कोटींंचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने हा निधी मंजूर केला. या रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करुन तातडीने काम सुरु करण्याच्या सूचना खा. दानवे यांनी सा. बां. विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे पूर्वी अंबड चौफुलीपर्यंतच या रस्त्याचे काम होणार होते. मात्र आता ते मंठा चौफुलीपर्यंत वाढविण्यात आले आहे. कामाचे दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार वडीगोद्री ते धनगरपिंप्री हा ३०. ३९ किलोमीटरचा एक टप्पा तर धनगरपिंप्री ते मंठा चौफुली हा २५.१७ किलोमीटरचा दुसरा टप्पा असणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १५८ कोटी ९० लाख रुपये तर दुस-या टप्प्यासाठी १७९ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन्ही कामे सोबतच सुरु होणार आहेत. हा संपूर्ण रस्ता सिमेंटचा असणार असून, केंद्र सरकारच्या निधीतून तो केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन कामे सुरु करण्याच्या सूचना खा. दानवे यांनी सा. बां. विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत.
जालना शहराच्या चारही बाजूने चांगले रस्ते होत आहेत. चिखली ते कन्हैय्यानगर हा रस्ता जालना-औरंगाबाद रस्त्यापर्यंत वाढविण्यात आला आहे. उद्योगाची गरज लक्षात घेऊन आता हा रस्ता बारवाले महाविद्यालयापर्यंत वाढविण्यात आला आहे.

Web Title: Green signal to Jalna-Vadigodari roadwork

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.