रक्तदान शिबिरातून महामानवाला अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:30 AM2021-04-16T04:30:13+5:302021-04-16T04:30:13+5:30
जालना : कोरोना विषाणू संकटाच्या काळात सध्या सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. हे लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाच्या ...
जालना : कोरोना विषाणू संकटाच्या काळात सध्या सर्वत्र रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. हे लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सामाजिक जाणीवेतून माळशेंद्रा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ६० जणांनी रक्तदान करून महामानवाला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले.
ग्रामपंचायत कार्यालय माळशेंद्रा, जय बाबाजी भक्त परिवार, राजे शिवछत्रपती मित्रमंडळ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने आयोजित या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा परिषद सदस्य बबन खरात, माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव शेवाळे, शिवसेना विभागप्रमुख प्रभाकर घडलिंग, शिवाजी जाधव, गंगाधर जाधव, रामेश्वर जाधव, माऊली जाधव, कृष्णा जाधव, सुरेश जाधव, सरपंच आनंद म्हस्के, उपसरपंच बालासाहेब जाधव, ग्रा.पं. सदस्य शिवाजी जाधव, नारायण जाधव, भानुदसा लहाने, कृष्णा लहाने, समाधान लहाने, कैलास डिगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले, देशावर आलेल्या कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे. मात्र, आपल्या आजूबाजूला अनेकांना कोरोनाची बाधा होत असून, संपर्णू परिवार अडचणीत येत आहे. अशा संकट काळात वैद्यकीय यंत्रणेवर कामाचा मोठा ताण असून, रक्ताचाही मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे माळशेंद्रा ग्रामपंचायतीने सामाजिक भान जपत डॉ.आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला रक्तदानाचा उपक्रम घेऊन कौतुकास्पद कार्य केले आहे, असेही ते म्हणाले. कृष्णा जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर भानुदास लहाने यांनी आभार मानले. शिबिरासाठी सुरेश जाधव, राजू म्हस्के, विष्णू म्हस्के, अनंता जाधव, एकनाथ जाधव,सदाशिव लहाने, भाऊसाहेब लहाने, भैय्या लहाने, संतोष लोखंडे, रामेश्वर जाधव, सोमीनाथ म्हस्के, विश्वनाथ जाधव, राजूअप्पा काटकर आदींनी परिश्रम घेतले.
महामानवाला अभिप्रेत असलेले कौतुकास्पद कार्य - राजेश राऊत
यावेळी बोलताना भाजपा शहराध्यक्ष राजेश राऊत म्हणाले की, कोविड काळात सार्वजनिक उपक्रमांवर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणूक काढणे, डीजे वाजवणे यास फाटा देत माळशेंद्रा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ.आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन रक्तदान शिबिराचे कौतुकास्पद कार्य केले आहे, असेही राऊत म्हणाले.