शहिदांना अभिवादन : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:35 AM2019-09-18T00:35:37+5:302019-09-18T00:36:08+5:30

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले.

Greetings to the martyrs: Marathwada MuktiSangram Day | शहिदांना अभिवादन : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

शहिदांना अभिवादन : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली.
शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृती स्तंभास मंगळवारी मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास आ. राजेश टोपे, जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जि.प. उपाध्यक्ष सतीश टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपाध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. अरविंद चव्हाण, भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, नागोजी सतकर, ब्रह्मानंद चव्हाण, एकबाल पाशा, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निºहाळी, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार संतोष बनकर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक रामेश्वरजी दायमा, तुळशीराम काळे, मंगलाबाई गिंदोडीया, इंदिराबाई तांबटकर, राणीरक्षा अब्दुल अजीज खॉ, अजीम खान, सुभद्राबाई शंकरराव देशमुख, कांताबाई विश्वंभर मिटकर, जयाबाई खांडेराव खलसे, कौशल्याबाई खरात, चांदबाई माणिकचंद कटारिया, प्रभावती गजानन जोशी यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ््यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Web Title: Greetings to the martyrs: Marathwada MuktiSangram Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.