सुदेश वाठोरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:35 AM2021-08-14T04:35:01+5:302021-08-14T04:35:01+5:30

रविवारी ऑनलाईन वधू- वर परिचय मेळावा जालना : भारतीय जैन संघटनेच्या वतीने समाजातील उच्चशिक्षित विवाह इच्छुक उमेदवारांचा राष्ट्रीय स्तरीय ...

Greetings to Sudesh Vathore | सुदेश वाठोरे यांचा सत्कार

सुदेश वाठोरे यांचा सत्कार

Next

रविवारी ऑनलाईन वधू- वर परिचय मेळावा

जालना : भारतीय जैन संघटनेच्या वतीने समाजातील उच्चशिक्षित विवाह इच्छुक उमेदवारांचा राष्ट्रीय स्तरीय ऑनलाईन वधू-वर परिचय मेळावा येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी दिली आहे. या मेळाव्यात डॉक्टर, इंजिनिअर, सीए. सी.एस. एम.बी.ए. आयएएस, पोस्ट ग्रॅज्युएट तसेच प्रोफेशनल इत्यादी ३५ वर्षापर्यंत उमेदवार सहभागी होऊ शकतात.

वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

जालना : तालुक्यातील रेवगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील वाचनालयात स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सव कार्यक्रमानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. उद्घाटन सरपंच वैशाली चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शीलाबाई जैस्वाल, उपसरपंच अनिता कदम, छाया बन, प्रभावती कमळू, सुभद्रा शेळके यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात आजपासून रक्तदान सप्ताहाचे आयोजन

जालना : भारतीय जैन संघटना, व्यापारी महासंघ, जनरल मर्चंट्स व जनकल्याण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिनानिमित्त १४ ते २१ ऑगस्टपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर जालना शहर तसेच ग्रामीण भागात घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. १४ ऑगस्ट रोजी अंबड, १५ ला जालना शहरातील जनकल्याण रक्तपेढी, १६ रोजी भोकरदन व राजूर, १७ ला शहागड, १८ ला तळेगाव, १९ आन्वा, २० परतूर व सातोना आणि २१ ऑगस्टला मंठा येथे होणार आहे.

मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा गौरव

जालना : महाराष्ट्र जिल्हा परिषद मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या रक्तदान शिबिराची दाखल घेत जनकल्याण रक्तपेढी तर्फे नुकताच संघटनेचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गजभिये, सुनील ढाकरके, शिवराज जाधव आदींची उपस्थिती होती.

केंद्रप्रमुख जाधव यांचा सत्कार

जालना : जालना तालुक्यातील सारवाडी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवनियुक्त केंद्रप्रमुख व्ही. एस. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांच्यासह जनार्दन काळे, कैलास काळे, गोवर्धन काळे, जनार्दन काळे, विलास नरवडे, रामेश्वर काळे, रमेश काळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गिराम यांनी केले.

Web Title: Greetings to Sudesh Vathore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.