किराणा मालाचे दर स्थिर : खाद्यतेलाचा मात्र पुन्हा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:03+5:302021-07-19T04:20:03+5:30

जालना : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बाजारात ग्राहकी नाही. सर्वच किराणा व धान्य मालाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, भाव ...

Grocery prices stabilize: Edible oil prices rise again | किराणा मालाचे दर स्थिर : खाद्यतेलाचा मात्र पुन्हा भडका

किराणा मालाचे दर स्थिर : खाद्यतेलाचा मात्र पुन्हा भडका

Next

जालना : कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे बाजारात ग्राहकी नाही. सर्वच किराणा व धान्य मालाचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, भाव स्थिर आहेत. खाद्यतेलांच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. डाळींच्या स्टाॅक लिमिट नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणार असल्याचे कळते.

खाद्यतेलांच्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने त्यावरील आयात शुल्क कमी केले होते. त्यामुळे मागील आठवड्यात सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरांत क्विंटलमागे एक हजार रुपयांची मंदी आली होती. मात्र, ही मंदी जास्त काळ टिकली नाही. खाद्यतेल पुन्हा क्विंटलमागे एक हजार रुपयांनी महागले. सध्या पामतेलाचे दर १३२००, सरकी तेल १४३००, सूर्यफूल तेल १६५००, सोयाबीन तेल १५००० आणि करडी तेलाचे दर २१२०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. डाळींवर असलेली स्टॉक लिमिट नियमांनुसार पाळली जावी, असा सरकारचा आग्रह असून, या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या नियमांतर्गत सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या असलेल्या डाळींच्या साठ्याची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास डाळीचा साठा सरकारला माहीत होईल आणि डाळींच्या किमतींवर नियंत्रण ठेवणे सरकारला सोपे होईल. केंद्र सरकारच्या स्टॉक लिमिट नियमामधून हरभरा वगळला असल्याची अफवा बाजारपेठेत जोरात आहे. त्यामुळे वायदा बाजारात हरभऱ्याच्या दरात १०० ते २०० रुपयांचा चढ-उतार होत आहे. हरभऱ्याच्या बाबतीत अद्याप असा कुठलाही निर्णय झाला नसून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशात २८ प्रकारच्या डाळींचा व्यापार होतो. काही डाळी समर्थन मूल्यांच्या नियमांच्या कक्षात येत नाहीत. काबुली चणा, मटर, राजमा, लोंबिया आणि मोट आदी डाळींना स्टॉक लिमिटच्या कक्षात ठेवू नये, अशी विनंती व्यापाऱ्यांनी सरकारकडे केली आहे. सध्या हरभरा डाळीचे दर ५६०० ते ५८००, तूर डाळ ८५०० ते ९५००, मूग डाळ ८००० ते ९०००, मसूर डाळ ७००० ते ७५०० आणि उडीद डाळीचे भाव ८००० ते ९८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

आषाढीनिमित्त उपवासांच्या पदार्थांना मागणी

येत्या मंगळवारी आषाढी एकादशी असून, त्या निमित्ताने उपवासाच्या पदार्थांना मागणी चांगली राहील, असे व्यापाऱ्यांना वाटते. सध्या शेंगदाण्याचे भाव ८००० ते ९५००, साबूदाणा ४५०० ते ५२००, भगर ६००० ते ९००० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. पेंड खजुराचे भाव ५० ते ८०० रुपये प्रतिकिलो असे आहेत.

Web Title: Grocery prices stabilize: Edible oil prices rise again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.