वीस गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:11 AM2019-04-19T01:11:44+5:302019-04-19T01:12:00+5:30
पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या नळणी बुद्रूकसह परिसरातील पंधरा ते वीस गावांमध्ये सद्य स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नळणी बु : पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या नळणी बुद्रूकसह परिसरातील पंधरा ते वीस गावांमध्ये सद्य स्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
नळणी बुद्रूक हे गाव पूर्णा नदीच्या तीरावर आहे. यामुळे येथे पाण्याचे नियोजन केल्यास नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही. परंतु, ग्रामपंचात कार्यालयाकडे या बाबत कोणतेच नियोजन नाही. त्यात यंदा अल्पसा पाऊस पडल्याने नदीला पाणी आले नसल्याने नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. यामुळे नळणी बुद्रूक परिसरातील गव्हाण संगमेश्वर, खापरखेडा, पिंपळगाव बारव, शिंदेवाडी, नळणी खुर्द, तळेगाव, तडेगाव वाडी, समर्थ नगर इ. गावांमध्ये पाणीटंचाई आहे.