मार्गदर्शन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:29+5:302021-01-23T04:31:29+5:30
पिके जोमात भोकरदन : गतवर्षी भोकरदन तालुक्यात अधिकचा पाऊस झाला असल्याने यंदा रब्बी पिकांच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. ...
पिके जोमात
भोकरदन : गतवर्षी भोकरदन तालुक्यात अधिकचा पाऊस झाला असल्याने यंदा रब्बी पिकांच्या पेऱ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या पिकेही चांगली आहेत. परंतु, मागील आठवड्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे गव्हू पिकावर मवा पडला आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी औषधांची फवारणी करीत असल्याचे चित्र भोकरदन तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे.
कपाशी मोडण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
भोकरदन : कपाशी पिकावर दरवर्षी पडत असलेली बोंडअळी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक मोडून काढून ट्रॅक्टरद्वारे नांगरट करावी, असे आवाहन कृषी सेवक संतोष वैराळकर यांनी केले आहे. याबरोबरच ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्या शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी, भुईमूग ही पिके घ्यावीत, असेही ते म्हणाले.
आव्हाना गावात अभिवादन कार्यक्रम
आव्हाना : वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त आव्हाना (ता. भोकरदन) येथील वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह चौकात त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चरणसिंग राजपूत, समाधान सोनवणे, उत्तमराव गावंडे, राजकुमार राजपूत, कपुरचंद काकरवाळ आदींची उपस्थिती होती.