‘लोकमत दिशा करिअर’तर्फे मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:40 AM2019-06-08T00:40:28+5:302019-06-08T00:40:34+5:30
लोकमत दिशा करिअरच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी शनिवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : इयत्ता बारावीनंतर काय करावे, हा विद्यार्थी आणि पालकांसमोर मोठा गंभीर प्रश्न निर्माण होतो. बारावीनंतरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या करिअरला प्रारंभ होतो. वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्या पाल्यांचे भविष्य उज्ज्वल होईल या आशेवर विद्यार्थी आणि पालक असतात, ती आशा पूर्ण करण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याबद्दल लोकमत दिशा करिअरच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी शनिवारी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सकाळी १० वाजता मा. फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजिण्यात आली आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते यजुर्वेद्र महाजन यांच्यासह प्रसिद्ध अभियांत्रिकी तज्ज्ञ महेश पाटील आणि अर्थतज्ज्ञ संतोष कार्ले हे उपस्थत राहणार आहेत. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी हे तिन्हीही मान्यवर थेट संवाद साधणार असून, विद्यार्थ्यांना येणाºया अडी-अडचणी प्रश्नोत्तराद्वारे जाणून घेणार आहेत.
आजघडीला कुठल्या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होईल, याबद्दलही हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आयुष्यातील या महत्त्वाच्या वळणावर योग्य दिशा मिळाल्यास उज्वल करिअर घेता येते. केवळ चांगली नौकरी मिळविणे, हेच करिअर नसून तो एक करिअरचा भाग आहे. परंतु स्वत:चा उपयोग सामाजिक क्षेत्र यासह माहिती व तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी महाविद्यालयातील बदलते प्रवाह तसेच त्यात होत असलेले बदल याबद्दल महेश पाटील हे मार्गदर्शन करणार असून, ते परभणी येथील आहेत. यजुर्वेंद्र महाजन हे महाराष्ट्रात सर्वपरिचित असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये कसे यश मिळवावे, या तंत्रातून अनेक विद्यार्थी घडविले आहेत. ते स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करतील.
संतोष कार्ले हे नामांकित अर्थतज्ज्ञ असून, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण आणि संशोधन परिषद पुणे यासह अन्य महत्त्वाच्या संस्थांवर ते कार्यरत आहेत. लोकमततर्फे एज्युकेशन फेअरमध्येही त्यांचा सिंहाचा वाटा असतो. महाराष्ट्रामध्ये करिअर मार्गदर्शनाविषयी त्यांचे बाराशे ते एक हजार दोनशेपेक्षा व्याख्याने झाले असून, त्यांनी १७ विद्यार्थ्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.
व्याख्यानाचा विषय
दहावी आणि बारावीनंतर काय ? परीक्षा व स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चाकोरीबाहेरील शिक्षणाच्या संधी कोणत्या आहेत आणि येणा-या दहा वर्षात विज्ञानामध्ये कोणत्या करिअरला मागणी असेल, यासह अन्य विषयावर ते संवाद साधणार आहेत.