दोषींना आज शिक्षा सुनावणार
By admin | Published: May 30, 2017 03:55 AM2017-05-30T03:55:35+5:302017-05-30T03:55:35+5:30
गाणे वाजविण्याच्या कारणावरून २००८ मधील उसळलेल्या दंगलीच्या खटल्याची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. न्यायालयाने यापूर्वीच
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गाणे वाजविण्याच्या कारणावरून २००८ मधील उसळलेल्या दंगलीच्या खटल्याची सुनावणी सोमवारी पूर्ण झाली. न्यायालयाने यापूर्वीच यात २१ जणांना दोषी ठरविले असून, शिक्षेबाबत युक्तीवाद करण्याची संधी बचाव पक्षाला देण्यात आली. त्यानुसार सोमवारी बचाव पक्षाच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडले. न्यायालय दोषींना मंगळवारी शिक्षा सुनावेल.
जालना तालुक्यातील सेवली गावात ३ एप्रिल २००८ मध्ये एका टपरीवर गाणे वाजविण्याचा कारणातून दोन गटात वाद झाला. यातूनच दंगल उसळून बळीराम जाधव याचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले होते. गुरुवारी न्यायाधीश एस. एस. कौसमकर यांनी २१ संशयितांना दोषी ठरविले. आरोपींच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालय सोमवारी निकाल देणार होते. पण बचाव पक्षाला शिक्षेबाबत युक्तीवाद करण्याची संधी देण्यात आली.