१५ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 12:20 AM2019-09-25T00:20:25+5:302019-09-25T00:20:41+5:30
अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पहाटे सुमारास शहरातील आष्टी रेल्वे गेटवर करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोला परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पहाटे सुमारास शहरातील आष्टी रेल्वे गेटवर करण्यात आली. यावेळी १५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
परतूर पोलीस मंगळवारी पहाटेच्या सुमारास शहरातील आष्टी रेल्वे गेटवर गस्त घालत होते. त्यावेळी एका संशयित टेम्पोला (क्र.एम.एच.२५- ए.जे.१७४४) पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी आतमध्ये १५ लाख ६० हजार रूपये किमतीचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी एन.एस. कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक रसूल रूकमोद्दीन इनामदार (रा. केसार जळगाव ता. उमरगा जि. उस्मानाबाद) क्लिनर जगन्नाथ शिवाजी गायाकवाड (रा. चिंचोली भुयार ता. उमरगा, जि.उस्मानाबाद) या दोघांविरूध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बाळासाहेब जाधव, पोहेकॉ नितीन कोकणे, आण्णासाहेब लोखंडे, पांढरपोटे, महाजन, होमगार्ड सुरूंग आदींनी केली.