पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:40 AM2019-02-27T00:40:10+5:302019-02-27T00:40:39+5:30
५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला.
लोकमत न्यूज नेटवर्क
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे तीव्र पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. विशेषकरुन महिलांची पाण्याविना मोठ तारांबळ उडत आहे. पाणी टंचाईकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, संतप्त महिलांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.
गावात ग्रामपंचायत मालकीच्या तीन विहिरी तसेच दोन बोअर आहेत. मात्र दुष्काळी परिस्थिमुळे विहिर आणि बोअरची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे एक महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा विकस्ळीत झाला आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. गावात मुलभूत सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने असतांना मात्र, याकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. चौदावा वित्त आयोग, कर वसूली, गाळ्याचे भाडे, तसेच आठवडी बाजाराच्या हर्राशीतून ग्रामपंचायतीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र असे असतांनाही पाणी समस्यावर ग्रामपंचात प्रशासन कानाडोळा करत आहे. पाण्याविना गैरसोय होत असल्याने ग्रामस्थांन निवेदन देऊन गावात टँकरणे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
मात्र अद्यापही टँकर सुरु करण्यात आला नाही. यामुळे संतप्त ५० ते ६० महिलांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढून ग्रामविकाऱ्यांना घेराव घालून या विषयी जाब विचारला. पाणी पुरवठा पूर्ववत करा अन्यथा यापेंक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येणार असल्याचे महिलांनी ग्रामसेवकाला फैलावर घेतले.
यावेळी सूबाबाई राखुंडे,बबिता राखुंडे,वंदना पटेकर,मनीषा तोडकर, लता पाटील, सखु राखुंडे,आशाबी शेख, करिमा कुरेशी, विमल खरात, मथुरा नरवडे, नंदा सोनवणे सह आदी महिलांनी सरपंच जैतूनबी बागवान व उपसरपंच शोभा पटेकर व ग्रामविकास अधिकारी एन.एम मंदोडे यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.