मौजमजा करताना छंदही जोपासावा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:04 AM2020-01-21T01:04:52+5:302020-01-21T01:05:44+5:30
विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना मौजमजा करावी, यासोबतच छंद जोपासावा. यातून विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध गायिका सुजाता पटवा (मुथियान) यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विद्यार्थ्यांनी करिअर घडविताना मौजमजा करावी, यासोबतच छंद जोपासावा. यातून विद्यार्थ्यांना हमखास यश मिळते, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध गायिका सुजाता पटवा (मुथियान) यांनी व्यक्त केले.
जेईएस महाविद्यालयाच्याविद्यार्थीसंसदेचे उद्घाटन सुजाता पटवा यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम बगडिया होते. प्रमुख पाहुणे म्हणून जालना एज्युकेशन सोसायटी उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, सचिव श्रीनिवास भक्कड यांची उपस्थिती होती. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. तत्पूर्वी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. राजेंद्र सोनवणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुढे बोलताना गायिका सुजाता पटवा म्हणाल्या, ध्येय साध्य करण्यासाठी मोठ्या शहरातच जावे असे नाही. छोट्या शहरातूनही ध्येय प्राप्ती करता येते, यासाठी विद्यार्थ्यांनी छंदावर प्रेम करावे, औद्यागिक क्षेत्रामध्ये आजही मुंबई, बंगळूरू सारख्या शहारातील नागरिक कामासाठी येतात. ते कुटुंबातील सदस्यांना दूर ठेऊन परिश्रम घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी ध्येय प्राप्तीसाठी परिश्रम घेणे हे क्रमप्राप्त आहे.
‘ऐ मेरे वतन के लोगों, जरा आंख में भर लो पाणी.. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो, कुर्बानी’..
हे गीतही सुजाता पटवा यांनी त्यांच्या खास शैलीत गायले. यावेळी टाळ््यांचा कडकडाट झाला.
कार्यक्रमाला दिलीप शाह, कैलास खट्टर, प्रकाश त्रिवेदी, हसमुख रायठठ्ठा, सुभाष गोयल, श्रीकृष्ण जवळकर, विद्यार्थीसंसद उपाध्यक्ष सचिन पवार, सचिव भीमाशंकर बेद्रे, सचसचिव शुभम शेळके, मनिषा जायभाये यांच्यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालकांची उपस्थिती होती. प्रभारी प्राध्यापक डॉ. महावीर सदावर्ते यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थी संसद अध्यक्ष प्रभू गाढे यांनी महाविद्यालयात झालेली वृक्षतोड यापुढे होऊ नये, असे सांगून एक कला शिक्षकाची नेमणूक करावी असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतीक साहित्य उपलब्ध करून पालकांसाठी वेटिंग रूम तयार करण्यात यावी, अशी मागणी प्राचार्यांकडे केली. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.