दोन हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल जाळ्यात

By दिपक ढोले  | Published: July 26, 2023 08:16 PM2023-07-26T20:16:43+5:302023-07-26T20:17:08+5:30

तक्रारदाराविरुद्ध अंबड तालुक्यातील कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे.

Head constable arrested while accepting a bribe of two thousand | दोन हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल जाळ्यात

दोन हजारांची लाच स्वीकारताना हेडकॉन्स्टेबल जाळ्यात

googlenewsNext

जालना : तक्रारदाराच्या आई-वडिलांवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी व अदखलपात्र गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबड पोलिस ठाण्याच्या हेडकॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी ताब्यात घेतले. महादू अप्पाराव पवार (५६ रा. नाव्हा, ता. जि. जालना) असे संशयिताचे नाव आहे.

तक्रारदाराविरुद्ध अंबड तालुक्यातील कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये तक्रारदारांध्या आई-वडील यांच्यावर पोहेकॉ. महादू पवार यांनी प्रतिबंधक कार्यवाही केलेली होती. तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे पोहेकॉ. महादू पवार हे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंंधक विभागाकडे केली. यावरून बुधवारी एसीबीने जालना शहरातील अंबडवरील एका बारमध्ये सापळा लावला.

यावेळी महादू पवार यांनी पंचांसमक्ष दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. शंकर मुटेकर, गजानन कांबळे, जावेद शेख, शिवाज जमधडे, गजानन घायवट, कृष्णा देठे, गणेश बुजाडे, ज्ञानदेव झुंबड, आत्माराम डोईफोडे, गजानन खरात, संदीप लहाने, विठ्ठल कापसे, प्रवीण खंदारे यांनी केली आहे.

Web Title: Head constable arrested while accepting a bribe of two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.