शेतकऱ्यांच्या मागे पीक पेरा नोंदणीची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:25+5:302021-09-12T04:34:25+5:30

राज्य शासनाच्या वतीने सन २०२१-२२ साठी खरीप हंगामातील पीक पेरा हा १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या स्वतःच्या मोबाइलच्या साह्याने नोंदवण्याचा आदेश ...

Headache of crop sowing registration behind farmers | शेतकऱ्यांच्या मागे पीक पेरा नोंदणीची डोकेदुखी

शेतकऱ्यांच्या मागे पीक पेरा नोंदणीची डोकेदुखी

Next

राज्य शासनाच्या वतीने सन २०२१-२२ साठी खरीप हंगामातील पीक पेरा हा १५ सप्टेंबरपर्यंत आपल्या स्वतःच्या मोबाइलच्या साह्याने नोंदवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. आदेशानुसार ई-पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद स्वतः शेतात जाऊन करावयाची आहे. ई- पीक पेरा नोंद न केल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावरील पीक पेरा कोरा राहील व त्यामुळे शेतकऱ्यास कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ किंवा मदत मिळणार नाही. बाजार समितीत माल विक्रीसाठी नोंद करणे, पीक विमा भरणे, पीक कर्ज घेणे इत्यादी कामांसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांची विमा कंपन्या व शासनाकडून अडवणूक होत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता मोबाइल, रिर्चाजचा खर्च वाढलेला आहे. काही शेतकऱ्यांकडे तर मोबाइलही नाही. काही शेतकऱ्यांना मोबाइलही वापरता येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

Web Title: Headache of crop sowing registration behind farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.