मुख्याध्यापक बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:42 AM2017-12-16T00:42:31+5:302017-12-16T00:42:41+5:30
भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील मुख्याध्यापक विलास भास्कर जाधव यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश चौकशी समितीने संस्थेला दिले आहेत.
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील तडेगाव येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील मुख्याध्यापक विलास भास्कर जाधव यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश चौकशी समितीने संस्थेला दिले आहेत.
सावित्राबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत डॉ़ बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय तडेगाव येथे विलास जाधव हे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांनी सदरील पदाचा गैरवापर करत संस्थाध्यक्षांच्या बनावट स्वाक्ष-या व शिक्के तयार करून लेखाधिकारी जालना यांच्याकडे खोटे प्रस्ताव सादर करून पडताळणी केली़ त्या आधारे भविष्य निर्वाह निधी पथक जालना यांच्याकडे सप्टेंबर २0१६ ते फेब्रुवारी २0१७ कालावधीत सहा महिन्यांचे भविष्य निर्वाह निधी घेऊन वेतन देयके मुख्याध्यापकसह गणेश श्रीराम जाधव, कृष्णा भाऊसाहेब लोखंडे, आनंद भगवान जाधव, अजय सुखदेव बनकर, सतीश सुभाष उबरहंडे आदी शिक्षकांची नावे समाविष्ट केली़ सेवा पुस्तिकेवर संस्थाध्यक्षाच्या बनावट स्वाक्ष-या केल्या. बोगस शिक्के मारून बोगस वेतनदेयके जोडून २० टक्के शासन अनुदान लाटले आहे़ मुख्याध्यापकाची चौकशी समितीमार्फत करण्यात आली. त्यात मुख्याध्यापक दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश संस्थेला दिले आहेत. या मुख्याध्यापकाने काही दिवसापूर्वी संस्थाध्यक्षावर दबाव आण्यासाठी भोकरदन पोलिसात तक्रार दाखल केली होती़ मात्र चौकशी समितीच्या बडतर्फ आदेशाने विद्यालयात खळबळ उडाली आहे़
-----------