तीर्थपुरीत दिव्यांगांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:58 AM2021-03-04T04:58:06+5:302021-03-04T04:58:06+5:30
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी भोकरदन : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अवैध दारूविक्रीमुळे ...
अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी
भोकरदन : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अवैध दारूविक्रीमुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून, तळीरामांमुळे भांडण-तंट्यातही वाढ होत आहे. याचा महिला, मुलींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सेवानिवृत्तीनिमित्त शेख यांचा सत्कार
जालना : शहरातील मुर्गी तलाव परिसरातील नगर परिषद शाळेतील शिक्षिका हादी बेगम महेबूब अली शेख यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी शेख यांनी आलेले अनुभव विषद केले. कार्यक्रमास शिक्षण सभापती आमेर पाशा, विजय फुलंब्रीकर, शिक्षणाधिकारी सुरेश सांगुळे, इरशाद कादरी, शबाना बेगम, शोभा टेकूर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापिका अख्तर जहाँ कुरेशी यांनी केले. सूत्रसंचालन शिरिन समीना यांनी केले.
मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई
वाटूर : गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांनी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सॅनिटायझर वापरणे आदीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. असे असले तरी, अनेक नागरिक नियम मोडून बाजारात गर्दी करीत आहेत. कोरोनाबाबत लागू असलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आला आहे.