आरोग्य अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 01:22 AM2018-05-20T01:22:04+5:302018-05-20T01:22:04+5:30
आरोग्य सेविकेची बदली करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारणा-या अंबड येथील तालुका आरोग्य अधिका-यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली. अनिल वामनराव वाघमारे (रा.धाईतनगर, अंबड) असे लाच स्वीकारणा-या अधिका-याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आरोग्य सेविकेची बदली करण्यासाठी पंधरा हजारांची लाच स्वीकारणा-या अंबड येथील तालुका आरोग्य अधिका-यांस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी अटक केली. अनिल वामनराव वाघमारे (रा.धाईतनगर, अंबड) असे लाच स्वीकारणा-या अधिका-याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार सुखापुरी (ता.अंबड) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या सोनकपिंपळगाव उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. प्रशासकीय किंवा विनंती कराणावरून दहीपुरी येथे बदली हवी असेल, तर पंधरा हजारांची लाच देण्याची मागणी आरोग्य अधिकारी अनिल वाघमारे याने सदर आरोग्य सेविकेकडे केली. अन्यथा काम होणार नाही म्हणून सांगितले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने आरोग्य सेविकेने लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळी करून शनिवारी एका खाजगी रुग्णालयात लाचेचा सापळा लावली. आरोग्य अधिकारी अनिल वाघमारे या तक्रारदाराकडून पंधरा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. या लाचखोर आरोग्य अधिका-यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद, विनोंद चव्हाण, अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, संतोष धायडे, संजय उदगीरकर, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर, रामचंद्र कुदर, महेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.