मालमत्ता कराच्या आक्षेप अर्जावर आजपासून सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:50 AM2018-12-11T00:50:58+5:302018-12-11T00:51:12+5:30

पालिकेने गेल्या पाच वर्षानंतर प्रथमच मालमत्ताकरात करवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आलेल्या आक्षेपांवर मंगळवारपासून सलग नऊ दिवस सुनावणी होणार आहे.

Hearing from today on the objections of property tax | मालमत्ता कराच्या आक्षेप अर्जावर आजपासून सुनावणी

मालमत्ता कराच्या आक्षेप अर्जावर आजपासून सुनावणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना पालिकेने गेल्या पाच वर्षानंतर प्रथमच मालमत्ताकरातकरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जवळपास शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करून नवीन कर आकारणीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. या नोटीसा मिळाल्यावर नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. या वाढीव करवाढीला अनेकांचा आक्षेप आहे. यासाठी जालना पालिकेने आक्षेप मागविले होते. जवळपास ९ हजार आक्षेप अर्ज आल्याचे सांगण्यात आले. या आलेल्या आक्षेपांवर मंगळवारपासून सलग नऊ दिवस सुनावणी होणार आहे.
जालना पालिकेला हक्काचे उत्पन्न मिळण्याचा स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर आणि नळपट्टी हे आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर मालमत्ता करात वाढ झालेली नव्हती. ही करवाढ करून त्यातून उत्पन्न वाढीचे प्रयत्न जालना पालिकेने केले आहेत. त्यानुसार एका सर्वेक्षण एजन्सीकडून श्हरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले.
त्यात नवीन बांधकाम केले आहे, काय केले असल्यास ते किती केले आणि त्याची बांधकाम परवानगी घेतली आहे काय अशी माहिती गोळा करण्यात आली. त्यानुसार संबंधितांना त्यांच्या घराचे दर्शनी भागाचे छायाचित्रासह नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
जालना पालिकेत पुढील दहा दिवस ही सुनावणी होणार असून, यासाठी जालना जिल्हा नगररचनाकार दिपक नागोरकर हे पालिकेत येऊन अर्जांवर म्हणणे जाणून घेणार आहेत. त्यांनी दिलेला निर्णय हा जवळपास अंतिम राहणार असल्याचे सांगण्यात आले.
नागोरकर यांना मदत करण्यासाठी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दहा स्वतंत्र टीम तयार केल्या आहेत. दररोज शंभर अर्जांवर सुनावणी करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगण्यात आले.
आलेल्या अर्जांची छाननी करून ते विभागनिहाय वेगवेगळे केले आहेत. त्यामुळे सुनावणीच्यावेळी येणाºया नागरिकांना सुलभ पध्दतीने आपले म्हणणे मांडता येणार आहे. यावेळी नागरिकांनी येताना त्यांना जे काय पुरावे सादर करायचे आहे, त्याच्या सत्यप्रती सोबत ठेवावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जालना : सुनावणी संदर्भात सूचना
ज्या अर्जदारांनी मालमत्ता करासंदर्भात आक्षेप अर्ज दाखल केले आहेत, त्यांना मोबाईल तसेच प्रत्यक्ष भेट देऊन सुनावणीसाठी हजर राहण्याचे कळविले आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. त्यानुसार त्यांनी सकाळी ९ ते सायंकाळी पाच यावेळेत आपले म्हणणे मांडण्यासाठी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी

Web Title: Hearing from today on the objections of property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.