हृदयद्रावक ! कौटुंबिक कलहातून महिलेची ४ लेकरांसह विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 01:53 PM2021-12-31T13:53:40+5:302021-12-31T13:54:38+5:30

जालन्यातील घुंगर्डे हादगाव गावातील हृदयद्रावक घटना, कौटुंबिक कलहतुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज...

Heartbreaking! Woman commits suicide in a well with 4 children due to family quarrel | हृदयद्रावक ! कौटुंबिक कलहातून महिलेची ४ लेकरांसह विहिरीत आत्महत्या

हृदयद्रावक ! कौटुंबिक कलहातून महिलेची ४ लेकरांसह विहिरीत आत्महत्या

Next

वडीगोद्री ( जालना ) : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका विवाहितेने पतीच्या दारूच्या व्यसनामुळे व कुटूंबिक वादातून पोटच्या चार लेकरासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ( Woman commits suicide with 4 children in Jalana) हृदयद्रावक घटना आज उघडकीस आली आहे. गंगासागर ज्ञानेश्वर अडाणी (३२),भक्ती (१३),ईश्वरी(११),अक्षरा(९) व मुलगा युवराज (७) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अंबड तालुक्यातील घुंगर्ड हादगाव गावातील ज्ञानेश्वर प्रल्हाद अडाणी हे पत्नी गंगासागर अडाणी व तीन मुली आणि एक मुलासह गावात राहतात.काल ३० डिसेंबर रोजी  दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गंगासागर ह्या तीन मुली व मुलासह शेतात चक्कर मारायला गेल्याचे अनेकांनी पाहिले. गंगासागर यांनी मुलामुलीसह सायंकाळी ५.३० शेतातच वेळ घालवला. 

सात वाजेपर्यंत ही गंगासागर व मुलं-मुली घरी परतले नसल्याने ज्ञानेश्वर अडाणी व गावातील नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोधाशोध केली. परिसरातील सर्व विहिरी व जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला.मात्र त्या आढळून आल्या नाही. रात्र झाली तरी घरी न आल्यामुळे घरच्यांनी व गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरू केला.गावकरी व अडाणी कुटुंबातील सदस्य यांनी ही आजूबाजूच्या शेतात व विहिरी पिजून काढल्या.त्यानंतर रात्रभर  शोध घेऊन ही सापडले नव्हते.

आज सकाळीच काहींच्या नजरेत अडाणी यांच्या शेताशेजारच्या गणेश फिसके यांच्या गट नं ९३ मधील विहिरीत या पाचही जणांचे मूतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.गंगासागर अडाणी हिने आपल्या चार मुलांसह विहिरीत उडया मारून आत्महत्या केली असल्याचे आढळून आले.
दरम्यान, या घटनेची माहिती गोदी पोलीस ठाण्यात दिल्याने घटनास्थळी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ सह कर्मचारी हजर होऊन या पाचही जणांचे मृतदेह विहिरी बाहेर काढून जाग्यावर शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलिसांनी ज्ञानेश्वर अडाणी यांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Heartbreaking! Woman commits suicide in a well with 4 children due to family quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.