परतूर तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:07 AM2019-07-11T01:07:16+5:302019-07-11T01:07:30+5:30

जालना शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर परतूर तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला.

Heavy rain in Partur taluka | परतूर तालुक्यात दमदार पाऊस

परतूर तालुक्यात दमदार पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / परतूर : जालना शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर परतूर तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.
जालना शहर व परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आलेले ढग पाहता मोठा पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र, रिमझिम पाऊस झाला. शहरासह परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.
परतूर तालुक्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाला. सुरूवातीस पडलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. पेरण्यांनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर या पावसाचे आगमन पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुक्यातील नदी, तलाव व विहिरी अद्यापही कोरड्या असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शिवाय बदनापूर शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये, अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव व परिसरातही पावसाने हजेरी लावली.

Web Title: Heavy rain in Partur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.