अंबड, घनसावंगीत पावसाचा जोर : सात मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:04 AM2021-09-02T05:04:39+5:302021-09-02T05:04:39+5:30
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने झोडपून काढले. पूर्णा, केळणा, रायधन या नद्यांना पूर आला होता. एकूणच या ...
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने झोडपून काढले. पूर्णा, केळणा, रायधन या नद्यांना पूर आला होता. एकूणच या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असून, मध्यम आणि लघु प्रकल्पांतील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. यंदा जिल्ह्याने ऑगस्टच्या मध्यातच पावसाची वार्षिक सरसरी ओलांडली होती.
चौकट
या सात मंडळात झाली अतिवृष्टी
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील सात महसूल मंडळात सोमवारी सकाळी मोजलेल्या पावसांच्या नोंदीत अंबड ८९, जामखेड ६९, राहिलागड ७८ तर घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी ७८, तीर्थपुरी १२१, कुंभारपिंपळगाव ८५ तसेच अंतरवाली ८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चौकट
पोळा सणावरील दुष्काळाचे मळभ हटले
पोळा सणांवर कमी पावसाचे जे मळभ होते. ते सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे दूर झाले आहे. पोळा सण सहा दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वत्र बैलांचे साज खरेदीसाठी बाजारपेठ सजली आहे. कोरोनामुळे यंदाही सामूहिक पोळासण साजरा होणार नसल्याचे सांगण्यात आले.