अतिवृष्टीचा सव्वादोन लाख हेक्टवरील पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:10+5:302021-09-14T04:35:10+5:30
चौकट हक्काची मदत तरी मिळावी केंद्र आणि राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाने या आधीच आपत्ती आल्यास कुठल्या शेतकऱ्यास ...
चौकट
हक्काची मदत तरी मिळावी
केंद्र आणि राज्य सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निवारण विभागाने या आधीच आपत्ती आल्यास कुठल्या शेतकऱ्यास कुठली आणि किती मदत द्यावी याचे निकष ठरले आहेत. त्यात पंचनाम्यांचा अहवाल आल्यावर ते लगेचच अदा करावेत असे निकष आहेत. त्यात कोरडवाहू साठी ६ हजार ५००, बागायती साठी १३ हजार रुपये आणि फळबागांचे नुकसान झाल्यास १८ हजार रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाते. त्यामुळे आता पंचनाम्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून, त्यानुसार ही मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
चौकट
सर्वपक्षीय नेत्यांच्या दौऱ्यांकडे लक्ष
अतिवृष्टी झाल्यावर पालकमंत्री राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल, आ. बबनराव लोणीकर, तसेच महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री अर्जुन खोतकर, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, आ. नारायण कुचे, नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सोळंके, गजानन गिते, आदींनी शेतात जाऊन पाहणी केली. तसेच जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठका घेतल्या. त्यामुळे आता मदतीकडे लक्ष लागून आहे.