इथं मोडीत निघतात जाती-धर्माच्या भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:11 AM2019-08-18T00:11:01+5:302019-08-18T00:12:16+5:30

जाती-धर्माच्या भिंतींना छेद देत गणेशोत्सवासह सर्व सण, उत्सव एकत्रितरीत्या साजरे करण्याची परंपरा जलना शहरासह जिल्ह्याने कायम जपली आहे.

Here the walls of caste-religion go away | इथं मोडीत निघतात जाती-धर्माच्या भिंती

इथं मोडीत निघतात जाती-धर्माच्या भिंती

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जाती-धर्माच्या भिंतींना छेद देत गणेशोत्सवासह सर्व सण, उत्सव एकत्रितरीत्या साजरे करण्याची परंपरा जलना शहरासह जिल्ह्याने कायम जपली आहे. या परंपरेला अधिक घट्ट केलं ते गुलाब खाँ पठाण या मूर्तीकाराने! गणेशोत्सवातील श्रींच्या मूर्ती तयार करण्यासाठी पठाण यांचे अख्खे कुटुंब सलग चार महिने परिश्रम घेते. त्यांनी तयार केलेल्या गणरायांच्या मूर्तींना जिल्ह्यासह बुलडाणा, औरंगाबाद जिल्ह्यातही मागणी आहे.
शहरी, ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळ, भाविकांकडून गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे. त्याच प्रमाणे जालना शहरातील राजीव गांधी नगर मधील लालबाग परिसरातील मूर्तीकार गुलाब खाँ राजदार खाँ पठाण व त्यांचे कुटुंबिय मागील चार महिन्यांपासून गणरायाच्या मूर्ती तयार करण्यासाठी परिश्रम घेत आहे. इयत्ता ४ थी च्या वर्गात शिक्षण घेत असताना गुलाब पठाण यांचा मित्र गणेश लांडगे हा विविध प्रकारच्या मूर्ती तयार करीत होता. लांडगे यांच्या घरी जाणे-येणं असल्याने गुलाब पठाण यांनाही मूर्ती तयार करण्याची आवड निर्माण झाली. वाढत्या वयाबरोबर त्यांनी मूर्ती तयार करण्याची कला जोपासली.
मजुरांच्या हाताला काम
गुलाब खाँ पठाण यांचे अख्खे कुटुंब गणेश मूर्ती तयार करण्यासाठी काम करते. या व्यवसायात इतर मजुरांच्या हाताला चार महिने काम मिळते. या व्यवसायातून पठाण यांच्यासह मजुरांच्या कुटुंबालाही आधार मिळाला आहे. येथील श्रींच्या मूर्ती खरेदीसाठी शहरासह परिसरातील भाविक गर्दी करतात.
व्यवसायाला महागाईचा फटका
दुष्काळ आणि वाढत्या महागाईची झळ पठाण यांच्यासह इतर मूर्तीकारांच्या व्यवसायाला बसली आहे. त्यामुळे यंदा गणरायांच्या मूर्तींचे दर २० टक्क्यांनी वाढणार असल्याचे ते पठाण सांगतात.
गणरायाच्या आकर्षक मूर्ती
गुलाबखाँ पठाण यांनी लालबागचा राजा, हत्ती सिंहासन असलेले गणराया, शंकराच्या रूपातील गणराया, राम मंदिरातील गणराया, बाल गणेश, शंकराच्या रूपातील गणराया, कृष्णाच्या रूपातील गणराया आदी विविध आकर्षक गणेश मूर्ती तयार केल्या आहेत.

Web Title: Here the walls of caste-religion go away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.