मित्रांसोबत शतपावली करत असताना टेम्पोची धडक; तरुणाचा मृत्यू

By दिपक ढोले  | Published: August 5, 2023 05:48 PM2023-08-05T17:48:30+5:302023-08-05T17:48:55+5:30

गंभीर जखमी तरुणाचा उपचार सुरु असताना झाला मृत्यू

Hit by tempo while doing Shatapavli: Youth dies | मित्रांसोबत शतपावली करत असताना टेम्पोची धडक; तरुणाचा मृत्यू

मित्रांसोबत शतपावली करत असताना टेम्पोची धडक; तरुणाचा मृत्यू

googlenewsNext

भोकरदन : जेवण करून रस्त्यावर शतपावली करणाऱ्या तरुणाला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिल्याची घटना भोकरदन तालुक्यातील देहेड येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. नवाबशाह गफूरशाह (३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नवाबशाह गफूरशाह याने शुक्रवारी रात्री आठ वाजता घरी जेवण केले. नंतर मित्रांसोबत तो देहेड ते पिंपळगाव रेणुकाई या रस्त्यावर फिरत होता. त्याचवेळी पिंपळगाव रेणुकाईकडून येणाऱ्या टेम्पोने नवाबशाह यांना जोराची धडक दिली. नंतर आयशरही उलटले. सोबत असलेल्या मित्रांनी नवाबशाह यांना तातडीने भोकरदन येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक युवराज पाडळे, कर्मचारी शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चालक नवदीप अतुल तिवारी (रा. कानपूर उत्तर प्रदेश) याला अटक करण्यात आली आहे. 

Web Title: Hit by tempo while doing Shatapavli: Youth dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.