जालन्यात विनाअनुदानित शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 04:55 PM2018-09-05T16:55:01+5:302018-09-05T16:55:47+5:30
महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कृती समितीकडून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. समोर धरणे आंदोलन केले.
जालना : महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेच्या जालना जिल्हा कृती समितीकडून आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जि.प. समोर धरणे आंदोलन केले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसर दणाणून गेला होता.
विविध शाळा, महाविद्यालयात गेल्या १७ वर्षापासून अनेक पात्र शिक्षक तुटपुंज्या वेतनावर काम करतात. या सर्व शिक्षकांना शासनाने शासन सेवेत समावून घेऊन इतर शिक्षकांसारखा पूर्ण पगार द्यावा, या प्रमुख मागणीसाठी विना अनुदानित कृती समितीकडून भीक मांगो आंदोलन करण्याचा इशारा कृती समितीने यापूर्वीच दिला होता. त्यानुसार बुधवारी सकाळी जिल्ह्यातील अनेक विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांनी एकत्रित येत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले. यावेळी जालना जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश शेळके, कार्याध्यक्ष भगवान काळे, ज्ञानेश्वर वायाळ, भरत जाधव, सुभाष जिगे, प्रा. प्रविण लहाने, प्रा. अनिल पंडीत, प्रा.एस.एन. हरणे, प्रा. रोहणकर, प्रा.संतोष राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती.