गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:27 AM2021-07-26T04:27:43+5:302021-07-26T04:27:43+5:30

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग n जालना शहरात नवीन वसाहती परिसरात रो-हाऊस फ्लॅटची बांधकामे सुरू आहेत. n ...

Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true? | गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग; घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

Next

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग

n जालना शहरात नवीन वसाहती परिसरात रो-हाऊस फ्लॅटची बांधकामे सुरू आहेत.

n शहरात शाळा, महाविद्यालये जवळ असल्याने अनेकांनी मुलांच्या सोयीसाठी शहरातच राहणे पसंत केले आहे. शहराच्या बाहेर घर घेतल्यास शाळा, महाविद्यालयात येण्याची सोय नसल्याचेही अनेकांचे मत आहे.

n दिवाळी, दसरा, अक्षय तृतीया या मुहूर्तावर नवीन बांधकामास प्रारंभ केला जातो. तसेच याच मुहूर्तावर नवीन फ्लॅट किंवा रो-हाऊस घेण्याकडे नागरिकांचा कल असतो.

दरवर्षी बांधकाम साहित्याच्या विक्रीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता; मात्र कोरोनामुळे शासनाकडून निर्बंध लागू केले जात असल्याने नवीन बांधकामे अत्यल्प सुरू आहेत. - नरेंद्र गाडवे

गेल्या वर्षभरात बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे अनेकजण बांधकाम करत नाहीत. - सचिन काळे

कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले. जमा पैशांमधून घर घेण्याचे स्वप्न होते. परंतु, बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे घर घेणे अवघड झाले आहे. - भागवत खरात

नवीन घर घेण्याचेच ठरवले होते. त्यानुसार आर्थिक नियोजनही केले होते; मात्र कोरोनामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. महागाईमुळे बजेट कोलमडले आहे. - गणेश पवळ

Web Title: Home loans are cheap, but construction materials are expensive; When will the dream of owning a house come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.