आशा सेविकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:32 AM2021-01-23T04:32:13+5:302021-01-23T04:32:13+5:30
जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार, दि. २२ रोजी मासिक सभा घेण्यात आली. यामध्ये कोरोनाकाळात अहोरात्र जिवाची पर्वा ...
जालना तालुक्यातील पीरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवार, दि. २२ रोजी मासिक सभा घेण्यात आली. यामध्ये कोरोनाकाळात अहोरात्र जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणार्या आशा सेविकांना वैद्यकीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरित करण्यात आले. यावेळी एलएचव्ही गिर्हे, फार्मसी अधिकारी ढिलपे, राणी पोतराजे, गटप्रवर्तक दीपा रगडे आदींची उपस्थिती होती. तसेच जिल्ह्यात येत्या ३१ जानेवारी रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. नियोजित १७ जानेवारीला होणारी ही लसीकरण मोहीम कोरोना लसीकरणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. केंद्र शासनाच्या निर्देशावरून येत्या ३१ जानेवारीला मोहीम राबवण्यात येणार असून, पीरपिंपळगाव आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या गावातील एकही बालक या मोहिमेपासून वंचित राहणार नाही. कोरोनाचे नियम पाळून, गर्दी न करता मोहीम यशस्वी करावी, असे आदेशही वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग यांनी दिले.
यावेळी आशा सेविका शारदा कांबळे, भारती जोगदंड, मीरा शेळके, राणी गव्हाड, लता गुडंलकर, शोभा सोनवणे, वर्षा ढगे, संध्या दाभाडे, सविता इर्शिद, तुळसा गायके, सत्यभामा गोरे, संगीता पगडे, रेणुका गिराम, मंदाकिनी नागरे, अलका वाघ, अलका खरात, सुनीता कांबळे, भारती बारवकर, माया गायकवाड, सुरेखा आचलखांब, कौसर पठाण, नंदिनी मिसाळ, पद्मावती लष्कर, संगीता गिराम, शारदा वाढेकर, लता जुंबड, अनिता जायंभाय, जिजा गाडेकर, रेखा गाडेकर, उषा शिंगणे, सुनीता जाधव, संगीता दाभाडे, कुशिवर्ता शेवाळे, कावेरी अंभोरे, जमुना खरात, मथुरा कचरे, वैशाली वैद्य, शंकुतला खडके, वर्षा लहाने आदींना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.