साळवेंच्या सन्मानाने चळवळीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:29 AM2019-01-24T00:29:03+5:302019-01-24T00:30:14+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेड करांनी जी परिवर्तनवादी चळवळ रूढ केली होती, त्या चळवळीचे पाईक होऊन संपूर्ण आयुष्य झिझवणाऱ्या अ‍ॅड. बी.एम. साळवे यांचा हा सन्मान म्हणजे युवकांना प्रेरणा देणारा आहे.

Honour of Adv. B. M. Salve | साळवेंच्या सन्मानाने चळवळीला गती

साळवेंच्या सन्मानाने चळवळीला गती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : डॉ. बाबासाहेब आंबेड करांनी जी परिवर्तनवादी चळवळ रूढ केली होती, त्या चळवळीचे पाईक होऊन संपूर्ण आयुष्य झिझवणाऱ्या अ‍ॅड. बी.एम. साळवे यांचा हा सन्मान म्हणजे युवकांना प्रेरणा देणारा आहे. आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित होऊन साळवे यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून वंचितासाठी आपले आयुष्य झिझवले आहे. त्यांच्या ध्येयनिष्ठेची परिवर्तनवादी चळवळीतील युवकांनी दखल घेऊन त्यातून प्रेरणा घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकल पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
प्रा.कवाडेंंच्या हस्ते जालन्यातील आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. बी.एम. साळवे यांचा सपत्नीक सत्कार बुधवारी सायंकाळी करण्यात आला.
बेधडक व्यक्तिमत्त्व
अ‍ॅड. बी.एम. साळवे म्हणजेच एक स्फूर्तीदायी व्यक्तिमत्त्व सर्वांना परिचित आहे. जे आहे, ते सत्य मांडण्यास ते कधीच कचरत नसत, एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय आहे. चळवळीत नि:स्पृह कसे काम करावे याचे उदाहरण साळवे हे आहेत. जालना असो व अन्यत्र कुठेही; वंचितांवर अन्याय झाल्यास ते पेटून उठतात. समाजकारण, राजकारण करताना त्यांनी नैतिकतेला महत्त्व दिले. ते खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचे साक्षीदार आहेत. त्यांच्या एकूणच कार्याबद्दल आपण फार पूर्वीपासून जाणतो. हा त्यांचा सन्मान म्हणजे आम्ही आमचे भाग्यच समजतो. - राज्यमंत्री अर्जुन खोतकर

Web Title: Honour of Adv. B. M. Salve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.