पावन तपोभूमीचा आदर करा-प.पू. प्रतिभाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:36 AM2019-02-05T00:36:05+5:302019-02-05T00:36:27+5:30
प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली.
सोमवारी गुरूगणेश महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. जालन्यासह अन्य राज्यातून भाविकांची मोठी उपस्थिती होती. सकाळी जैन गुरूंनी प्रवचन दिले. यावेळी गुरूगणेश महाराजांचे महत्व आणि त्यांनी केलेल्या तपस्येचे फळ आपण भोगत असल्याचे सांगून जालन्यात गुरूगणेश महाराजांची समाधी असल्याने जालना शहर पावन झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी सकाळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाधी स्थळास भेट देऊन दर्शन घेतले. मुुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करुन घेणार असल्याची ग्वाही खोतकर यांनी यावेळी बोलतांना दिली.
यावेळी धर्मसभेत प. पू. अर्चनाश्रींजी, आचार्य प. पू. श्री शिवमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती उपप्रदवर्तक प. पू. श्री. विवेकमुनिजी, श्रमण संघीय उपप्रवतक पंडितरत्न प. प. श्री. प्रमोदमुनिजी म. सा. तसेच शासन प्रभाविका प. पू. श्री दिलीपकंवरजी, स्वाध्यायप्रेमी प. पू. उज्वलकंवरजी, आचार्य सम्राट प. पू. श्री आनंदऋषिजींच्या शिष्या प. पू. श्री अर्चनाश्रीजीं म. सा. (मिरा) प. पू. सुशिलकंवरजी, प. पू. किरणसुधाजी, प. पू. श्री गुलाबकंवरजी, प. पू. प्रशांतकंवरजी, प. पू. श्री नमीताजी, प. पू. पुण्यस्मिताजी, प. पू. अनुप्रेक्षाजी, प. पू. दर्शनप्रभाजी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनीही विचार व्यक्त करून गुरू गणेश महाराजांच्या समाधीचा परिसर विकसित करण्यास यापूर्वीही मदत केली असून, पुढेही करणार असल्याचे ते म्हणाले. उपस्थितांचे आभार श्रावक संघाचे विश्वस्त कचरुलाल कुंकूलोळ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष डॉ. गौतमचंद रुणवाल, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, महामंत्री स्वरुपचंद ललवाणी, सहमंत्री भरतकुमार गादिया, कोषाध्यक्ष विजयराज सुराणा, विश्वस्त संजयकुमार मुथा, सुदेशकुमार सकलेचा, डॉ. धरमचंद गादिया, डॉ. कांतीलाल मांडोत, सुरजमल मुथा आदींनी परिश्रम घेतले. सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते.