शेतकऱ्याने माळरानावर फुलविली फळबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:51 AM2018-10-02T00:51:54+5:302018-10-02T00:52:11+5:30
नवनवीन प्रयोग करुन पाहणाºया एका शेतक-याने शेवटी फळबागेचा प्रयोग केला. आणि यात त्या शेतक-याला भरघोस असे यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : जमीन १५- २० एकर असली तरी मुरमाड असल्याने त्यात पाहिजे तसे उत्पन्न निघायचे नाही. कधी-कधी तर लावलेला खर्च निघणेही मुश्कील व्हायचे. अशा परिस्थितीत आपली जिद्द न सोडता शेतीत नवनवीन प्रयोग करुन पाहणाºया एका शेतक-याने शेवटी फळबागेचा प्रयोग केला. आणि यात त्या शेतक-याला भरघोस असे यश आले. फळबागांतून कमी पाण्यावर व मुरमाड जमीनीत वषार्काठी २० लाखाचे उत्पन्न घेणारे जाफराबाद तालुक्यातील काळेगाव येथील शेतकरी शेख मोबीन व त्यांचे पुत्र शेख अक्रम हे दुष्काळाने होरपळणाºया शेतकरयांसाठी एक आशेचा किरण बनले आहे.
खडकाळ जमीन व पाण्याची कमतरता असतानाही प्रयोगशील शेतकरी शेख मोबीन यांनी आपली जिद्द सोडली नाही. त्यांनी आजपासून सहा वषार्पूर्वी डाळिंब बागेपासून फळबागेला प्रारंभ केला. शेतात लावलेली डाळींबाची १५०० झाडे चांगलीच बहरली. या बागेतून त्यांना १५ लाखापर्यंतचे उत्पन्न मिळू लागले. यानंतर त्यांनी सिताफळाची ११०० झाडे लावली. ही झाडेही मागील वषार्पासून उत्पन्न देवू लागली असून यंदा कमी बहरूनही त्यांची सिताफळ बाग तीन लाखात विकली गेली आहे. यासोबतच आता त्यांनी आपल्या शेतात पेरूचीही ७०० झाडे कमी पाण्यावर बहरवली आहे. यातूनही चार- पाच लाख उत्पन्न मिळण्याची आशा शेख अक्रम यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे या सर्व फळबागांतील माल ते व्यापा-यांना जागेवरच देतात. दुरदूरून व्यापारी हा माल खरेदी करण्यासाठी हंगामात त्यांच्या शेतावर गर्दी करतात. शेख यांनी फुलवलेली फळशेती परिसरातील शेतक-यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.