बिलावरून वाद घालत हॉटेल चालकास मारहाण करून लुटले; चार आरोपी तीन तासांत जेरबंद

By विजय मुंडे  | Published: July 31, 2023 07:45 PM2023-07-31T19:45:09+5:302023-07-31T19:45:26+5:30

पोलिसांनी संशयित दुचाकींचा शोध सुरू केला आणि तीनच तासात आरोपी ताब्यात घेतले

Hotel driver, workers beaten and robbed, four accused jailed within three hours | बिलावरून वाद घालत हॉटेल चालकास मारहाण करून लुटले; चार आरोपी तीन तासांत जेरबंद

बिलावरून वाद घालत हॉटेल चालकास मारहाण करून लुटले; चार आरोपी तीन तासांत जेरबंद

googlenewsNext

जालना : हॉटेल चालक, कामगारांना मारहाण करीत गल्ल्यातील दोन हजारांची रोकड लंपास करणाऱ्या चौघांना जालना तालुका पोलिसांनी तीन तासांत जेरबंद केले. ही घटना रविवारी रात्री जालना शहरानजीक घनसावंगी रोडवर घडली.

बापूसाहेब विठ्ठलराव लव्हाळे, रमेश विष्णू कवळे, नयनसिंग राजूसिंग खंदाडे, बाबासाहेब देवीदास आदमाने (सर्व रा. पाचनवडगाव, ता. जालना) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. माळी पिंपळगाव येथील दिलीपसिंह अंबरसिंह मुऱ्हाडे यांचे जालना शहराजवळील घनसावंगी रोडवर हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये रविवारी रात्री आलेल्या चौघांनी जेवणाच्या बिलावरून भांडण केले. तसेच मुऱ्हाडे यांच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी करीत साहित्याची मोडतोड केली आणि गल्ल्यातील दोन हजार रुपये घेऊन पळ काढला. जखमी मुऱ्हाडे यांनी तत्काळ तालुका पोलिस ठाणे गाठून घडलेली घटना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दुचाकींचा शोध सुरू केला आणि तीनच तासात पाचनवडगाव येथील बापूसाहेब लव्हाळे, रमेश विष्णू कवळे, नयनसिंग राजूसिंग खंदाडे, बाबासाहेब देवीदास आदमाने या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकींसह गल्ल्यातून पळविलेले दोन हजार रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोउपनि. हरीश राठोड, पोकॉ. बळीराम तळपे हे करीत आहेत. ही कारवाई पाेलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. राहुल खाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. जनार्दन शेवाळे, पोउपनि. भताने, पोउपनि. राठोड, पोकॉ. चंद्रकांत माळी, वसंत धस, पोकॉ. बळीराम तळपे, चालक पोकॉ. ढाकणे यांच्या पथकाने केली.

बुधवारपर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना सोमवारी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी पोउपनि. हरीश राठोड यांनी सांगितले.

Web Title: Hotel driver, workers beaten and robbed, four accused jailed within three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.