पेरजापूर येथे आगीत घर भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:30 AM2021-05-13T04:30:24+5:302021-05-13T04:30:24+5:30

जालना : जामखेड येथील लसीकरण केंद्रावर मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान, लसीची मात्रा कमी असल्याने ...

A house caught fire in Perjapur | पेरजापूर येथे आगीत घर भस्मसात

पेरजापूर येथे आगीत घर भस्मसात

Next

जालना : जामखेड येथील लसीकरण केंद्रावर मंगळवारी सकाळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान, लसीची मात्रा कमी असल्याने टोकन पद्धतीने लसीकरण करण्यात आले. लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती झाल्यामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पाथरवाला येथे लसीकरण

अंबड : अंबड तालुक्यातील शहागड व पाथरवाला येथे मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शहागड २२० तर पाथरवाला येथे १५८ जणांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी मीरा सावंत, डॉ. राजेंद्र गायके, शिल्पा बनकर, विजय कांबळे, संजय जाध‌व, रूक्मिणी टोपे, स्वाती उबाळे, जयश्री वारे, मीरा घाडगे आदींची उपस्थिती होती.

विलगीकरण कक्षात नाष्ट्याची व्यवस्था

अंबड : शहरात पाचोड मार्गालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात सुरू असलेल्या विलगीकरण कक्षात दररोज नित्यनेमाने सकाळी काढा, चहा, नाष्टा, दुपारी व सायंकाळी जेवण दिले जात आहे. उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार गौरव खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जेवणाचे वाटप केले जात आहे.

निधोना येथे १३९ जणांचे लसीकरण

जालना : जालना तालुक्यातील निधोना येथे पीर पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतच्या वतीने ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. पहिल्या टप्प्यात १३९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. सरपंच सुमन आदमाने यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी राहुल आदमाने, रेणुका सोनवणे, के.के. बोर्ड आदी उपस्थित होते.

लालवाडीत लसीकरणाला प्रतिसाद

मठपिंपळगाव : अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या लालवाडी येथे मंगळवारी लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. यात लालवाडी येथील १७४ तर मसई येथील १७२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अग्रवाल, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी थोरात, डॉ. साधना शिंदे, गणेश रोकडे आदींची उपस्थिती होती.

नाल्या फुटल्याने मुख्य रस्त्यावर सांडपाणी

परतूर : दोन वर्षांपूर्वी बांधलेल्या रामगल्लीतील नाल्या फुटल्या असून, सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पालिका प्रशासनाने नव्या नाल्या बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ११९५ पूर्वी या भागात नगरपालिकेने नाल्या बांधल्या होत्या. मात्र, नाल्यांचे बांधकाम पूर्ण जीर्ण झाले आहे. आता या नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर

जालना : समस्त ब्राम्हण समाज जालना तर्फे आयोजित भगवान परशुराम सार्वजनिक जन्मोत्सवानिमित्त १४ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जुना जालना भागातील शनिमंदिर जवळील आनंदी कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० ते ४ वाजेच्या सुमारास जनकल्याण रक्तपेढीच्या सहाकार्यातून हे शिबिर होणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष विनाेद कुलकर्णी, शुभम कौडगावकर, कार्याध्यक्ष अनंत वाघमारे यांनी केले आहे.

Web Title: A house caught fire in Perjapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.