चंदनझिरा येथे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:28 AM2021-03-07T04:28:02+5:302021-03-07T04:28:02+5:30

हिस्वन येथे दुकान फोडले जालना : सोहम मोटार रिवायडिंग दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून मोटार पंप व इतर साहित्य असा ...

The house at Chandanjira was broken into | चंदनझिरा येथे घर फोडले

चंदनझिरा येथे घर फोडले

Next

हिस्वन येथे दुकान फोडले

जालना : सोहम मोटार रिवायडिंग दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून मोटार पंप व इतर साहित्य असा ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जालना तालुक्यातील हिस्वन खुर्द येथे ६ मार्च रोजी घडली. या प्रकरणी गंगाधर बाबासाहेब आटोळे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. तुपे हे करीत आहेत.

अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जालना : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील घानखेडा शिवारातील नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी शनिवारी पकडले. या प्रकरणी प्रशांत लोखंडे यांच्या फिर्यादीवरून रियाज शहा ईस्माईल शहा, शिवाजी राजपूत, अहमद बाबुखा पठाण, विलास वानराव लहाने यांच्याविरुद्ध जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सफौ. सहाने हे करीत आहेत.

रेवगाव परिसरातून मोटार चोरीस

जालना : विहिरीवरील ७ इलेक्ट्रिक मोटारी व २० किलो वायर असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १ मार्च रोजी रेवगाव येथे घडली. या प्रकरणी गणपत कोपरगे यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कांबळे हे करीत आहेत.

शहरात मेडिकल फोडले

जालना: मेडिकलच्या शटरचे लॉक तोडून गल्ल्यातील रोख रक्कम १८ हजार यपये चोरून नेल्याची घटना ५ मार्च रोजी घडली. याप्रकरणी म. आखेब म. अख्तर शेख यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना दाभाडे हे करीत आहेत.

पाच जणांची एकास मारहाण

जालना : किरकोळ कारणावरून एकास पाच जणांनी मारहाण केल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी जालना शहरातील संभाजीनगर येथे घडली. याप्रकरणी दरपणसिंग सुखमणी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अमोल नागवे (रा. गांधीचमन), उमेश पवार (रा. संभाजीनगर), शुभम जगताप (रा. संभाजीनगर), करण चांदोडे (रा. संभाजीनगर), सूर्या पूर्ण नाव माहीत नाही (रा. लक्ष्मीनारायणपुरा), मंगलसिंग मिल्खासिंग (रा. जालना) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना. घुगे हे करीत आहेत.

Web Title: The house at Chandanjira was broken into

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.