टेलिकॉम कॉलनी येथे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:36+5:302021-04-10T04:29:36+5:30
कत्तलीसाठी बैल नेणाऱ्यांवर गुन्हा जालना : बैलाची चोरी करून कत्तलीसाठी नेणाऱ्या पाच जणांविरुध्द गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...
कत्तलीसाठी बैल नेणाऱ्यांवर गुन्हा
जालना : बैलाची चोरी करून कत्तलीसाठी नेणाऱ्या पाच जणांविरुध्द गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना घनसावंगी तालुक्यातील भायगव्हाण येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी पो.ना. नारायण माळी यांच्या फिर्यादीवरून कादिर शेख शमशोद्दीन शेख, बबलू मन्सुर सय्यद, जीजा अर्जुन पवार, कासिम कुरेशी व अन्य एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा
जालना : फिर्यादीला वारंवार ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी मंठा येथील तळणी फाटा येथे घडली. या प्रकरणी गोपाळ बोराडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिलीप सुखदेव राऊत (रा. पळसखेडा पिंपळे) याच्याविरुध्द मंठा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.नि. बागुल हे करीत आहे.
जुगार खेळणारा अटकेत
जालना : परतूर येथील रेल्वेगेटजवळ लोकांना जास्तीच्या पैशांचे आमिष दाखवून जुगार खेळणाऱ्यास परतूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून जुगार साहित्यासह २१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गणेश विठ्ठल शिंदे यांच्या फिर्यादीवरून समद अन्सारी गणी अन्सारी (रा. लड्डा कॉलनी रा. परतूर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.ना. पाऊलबुदधे हे करीत आहेत.