खाकीतील माणुसकी : अंबड पोलिसांनी दाखविले माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:15+5:302021-09-21T04:33:15+5:30
सोमवारी भल्या पहाटे म्हणजेच साडेतीन वाजेच्या सुमारास सुग्रीव चाटे व त्यांचे सहकारी हे अंबडकडे परतत होते. त्याचवेळी घनसावंगी ...
सोमवारी भल्या पहाटे म्हणजेच साडेतीन वाजेच्या सुमारास सुग्रीव चाटे व त्यांचे सहकारी हे अंबडकडे परतत होते. त्याचवेळी घनसावंगी ते अंबड रोडवरील ताडहदगाव शिवारात एक जीप रस्त्यावर उभी दिसल्याने चाटे यांनी विचारपूस केली असता, चालकाने जीपमध्ये अनुजा विकास पवार रा.शेवता ता.घनसावंगी येथील महिला असून, तिला प्रसूतीसाठी अंबड सरकारी दवाखान्यात घेऊन जात असल्याचे सांगितले; मात्र गाडीतील डिझेल संपल्याने आम्ही थांबलो असल्याचेही चालकाने नमूद केले. ही माहिती कळल्यावर चाटे यांनी लगेचच प्रसंगावधान राखून त्या महिलेसह पती आणि अन्य नातेवाईकांना पोलिसांच्या गाडीत बसविले. थोडे अंतर जात नाही तोच त्या महिलेने एका छोट्या गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर चाटे यांनी त्या महिलेस अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन भरती केले. आज आई आणि त्या बाळाची प्रकृती ठणठणीत आहे. चाटे यांच्या या सहकार्यामुळे पवार परिवारासह अन्य नागरिकांनी स्वागत केले.