वानडगाव येथे साडेसात हजार कामगंध सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:44 AM2019-07-19T00:44:51+5:302019-07-19T00:45:17+5:30

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.

Hundreds of thousands of caged traps in Wandgaon | वानडगाव येथे साडेसात हजार कामगंध सापळे

वानडगाव येथे साडेसात हजार कामगंध सापळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे.
अशा प्रकारचा कामगंध सापळे बसविण्याचा हा राज्यातील कदाचित पहिलाच प्रयोग असावा, असे सांगण्यात आले. वानडगाव येथे लागवडीखालील क्षेत्र जवळपास १८ हजार एकर आहे. त्यापैकी ७५० एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी शेंदरी बोेंडअळीमुळे कपाशीचे उत्पन्न निम्यापेक्षा अधिक घटले होते. यावर प्रभावी उपाय म्हणून कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी देखील विशेष उपाययोजना सुचविल्या होत्या.
गुजरातमधून आलेल्या शेंदरी बोंडअळीने संपूर्ण महाराष्ट्रात हल्लाबोल केला होता. त्यातून सावरण्यासाठी शेतक-यांनी त्यावेळी कपाशीची लागवड लवकर करून त्याची वेचणी देखील गतीने करण्यात आली. राहिलेल्या प-हाट्यांचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी त्या जाळून टाकण्यात आल्या होत्या. एवढ्यावरही बोंडअळीने २०१७-१८ मध्ये जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढले होते. शेंदरी बोंडअळीचा आकार तांदळाच्या दाण्याऐवढा असल्याने तिचा हल्ला झाल्यावर प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. परंतु ज्यावेळी उगवलेल्या कपाशीच्या पानांवर छिद्र पडतात. त्यावेळी या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात येते. सामूहिक उपाययोजने अंतर्गत कामगंध सापळे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अजय मिटकरी तसेच वानडगाव येथील प्रवीण एखुंडे, पांडुरंग जºहाड, सुजीत जोगस, सतीश प्रधान, सचिन कोल्हे, सुखदेव नरवडे, तुषार थिटे, कोमल घारे यांची उपस्थिती होती. या सामूहिक उपाययोजनेतून नेमका किती फरक पडतो, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
शेंदरी बोंडअळी : राज्यातील पहिला सामूहिक प्रतिबंधक प्रयोग
सध्या मका पिकावर लष्करी अळीने हल्ला चढविला आहे. त्यामुळे मक्याचे पीक धोक्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी असाच हल्ला शेंदरी बोंडअळीने कपाशी पिकावर केला होता. त्यातून शेतक-याचे मोठे नुकसान झाले होते. कपाशीवर पडलेल्या या बोंडअळीमुळे कपाशीचा दर्जाही घसरला होता.
याचा परिणाम म्हणून शेतक-यांना कपाशीला पाहिजे तसा भाव मिळाला नव्हता. ही बाब कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, मुख्य समन्वयक एस.व्ही. सोनवणे यांनी गांभिर्याने घेतल्याची माहिती शास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी दिली. वानडगावमध्ये आज सर्वत्र उत्साही वातावरण होते.

Web Title: Hundreds of thousands of caged traps in Wandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.