वालसावंगीत हुरडा पार्टींना आलाय जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:28 AM2021-01-22T04:28:05+5:302021-01-22T04:28:05+5:30
वारंवार वाहतूक जाम जालना : शहरातील पाणीवेस परिसरात नियमित सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वेस लहान आहे. ...
वारंवार वाहतूक जाम
जालना : शहरातील पाणीवेस परिसरात नियमित सायंकाळी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही वेस लहान आहे. असे असतानाही येथून दोन्ही बाजूने येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. शिवाय येथे पोलीसही नसतात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते.
गोरगरिबांना चादरींचे वाटप
जालना : अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विलास वाघमारे यांच्यातर्फे गरजवंत व गोरगरिबांना चादरींचे वाटप करण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सचिन क्षीरसागर, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन शिंदे, रमेश कव्हळे, नंदा पवार व गणेश चांदोडे आदी उपस्थित होते.
पोलीस कर्मचारी राठोड, जोशी यांचा सत्कार
मंठा : मंठा तालुक्यातील खोराडसावंगी परिसरातील तलावात बुडणाऱ्या एका मुलास पोलीस नाईक सुभाष राठोड व होमगार्ड नंदकिशोर जोशी यांनी वाचविले. त्या मुलाला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी सत्कार केला. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
परतूर येथे घरफोडी; गुन्हा दाखल
परतूर : घरात कोणी नसल्याने चोरट्यांनी घराचे कुलूप तोंडून सोन्याचे दागिने व नगदी १५ हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री परतूर शहरात उघडकीस आली. बसस्थानकाजवळ राहणारे शेख आवेज शेख कलीम कुटुंबासह नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. मंगळवारी घरी आले असता, खोल्यांचे कुलूप तुटल्याचे दिसले. याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस अभिवादन
जालना : वडीगोद्री येथे महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब गावडे, ॲड. वैभव खटके, ॲड. विजय खटके, मनसेचे युवानेते अनिकेत खटके, संतोष बिबे, बळीराम कोकणे, तुकाराम आटोळे, सुरेशसिंह राजपूत, सरदार ठाकूर, रमेश शेगर, प्रल्हादसिंग ठाकूर, शुभम परदेशी, मंगलसिंह ठाकूर, अमरसिंह काळे, अमोल चव्हाण, दिलीप ठाकूर, गणेशसिंह ठाकूर आदींची उपस्थिती होती.
शिक्षकांनी स्वखर्चातून बदलले शाळेचे रूपडे
भोकरदन : नवे भोकरदन भागातील नंदुबाईनगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी वर्गणी गोळा करून स्वखर्चातून शाळेच्या वास्तूची रंगरंगोटी केली आहे. शिक्षकांच्या योगदानामुळे संपूर्ण शाळेचे रूपडे बदलेले आहे. आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून हे काम केल्याचे शिक्षकांनी स्पट केले. मुख्याध्यापिका पूनम चराटे, सहशिक्षक रामेश्वर शर्मा, संदीप शर्मा या तिघांनी स्वकल्पनेतून शाळेचे स्प्रे पेंटिंगचे काम पूर्ण केले आहे.
अखिल भारतीय सेनेचे मागण्यांचे निवेदन
जालना : जालना शहरात अवैधपणे गुटखा विक्री करणाऱ्या आणि मटका चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्यात आले. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनावर शहरप्रमुख उमेश खाकीवाले, संघटक अनिल वानखेडे, सचिव सुंदर सगट, आनंद बोराडे, अर्जुन फत्तेलष्करी, आकाश घाटोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.