स्वच्छता सर्वेक्षण; शहराचे मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:43 AM2018-03-07T00:43:43+5:302018-03-07T00:44:07+5:30
स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी पालिकेकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छता, शौचलयांचा वापर, नागरिकांमध्ये झालेली जनजागृती याची व केंद्रीय पथकद्वारे शहरात चार दिवस तपासणी करण्यात आली. स्वच्छतेच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र शासनाला सादर केला जाणार आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्चअखेर देशातील चार हजार शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाबरोबच हगणदारीमुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, स्वच्छतेत नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे, हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. सर्वेक्षणांतर्गत नागरिकांना थेट तक्रार करता यावी यासाठी स्वच्छता अॅपही उपलब्ध करून देण्यात आले होते. अॅपवर प्र्राप्त तक्रारी व उपाययोजनांमुळे जालना शहर सध्या ८८ क्रमांकार आहे. पालिकेने शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार शहरात प्रत्यक्ष काम झाले आहे, का याची तपासणी करण्यासाठी शहरात सुरू असलेल्या तपासणीचा सोमवारी सायंकाळी समोराप झाला. केंद्रीय पथकातील प्रकाश मुतळे यांनी चार दिवस शहरात फिरून कचरा डेपो निष्कासित करणे, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांचा वापर, घंटा गाड्यांद्वारे होणारे कच-याचे संकलन, व्यापारी भागात होणारी रात्रीची स्वच्छता, हगणदारीमुक्त ठिकाणे याची तपासणी केली. पालिकेचे अभियंता रत्नाकर अडसिरे, माधव जामधडे यांनी मुतळे यांना सहकार्य केले.
स्वच्छता सर्वेक्षणाच्या मूल्यांकनाचा हा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. मार्चअखेर देशातील चार हजार शहरांचे मूल्यांकन झाल्यानंतर उत्कृष्ट कार्य करणा-या तीन शहरांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यातील पहिले पारितोषिक १५ कोटींचे असणार आहे.
जालना नगरपालिका : तपासणीसाठी मोबाईल अॅपचा वापर
शहर स्वच्छतेचे मूल्यांकन करताना अनेक भागांत जाऊन प्रत्यक्ष स्वच्छतेची छायाचित्रे प्रथमच मोबाईल अॅपमध्ये घेऊन तात्काळ पाठविण्यात आली. शहरातील नूतन वसाहत, कन्हैय्यानगर, लालबाग, इंदिरानगर, घायाळनगर इ.भागांतील नागरिकांचे प्रत्यक्ष अभिप्रायही नोंदविण्यात आले. अनेक नागरिकांनी पूर्वीपेक्षा शहर स्वच्छतेत सुधारणा झाल्याच्या प्र्रतिक्रिया तपासणीदरम्यान व्यक्त केल्या.