मी पाणी बंद केलं, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By विजय मुंडे  | Published: November 1, 2023 07:45 PM2023-11-01T19:45:39+5:302023-11-01T19:48:55+5:30

खोट्या केसेस दाखल करू नका, नागरिकांचा रोष वाढतोय

I stopped drink water, now I will not withdraw until get reservation; Manoj Jarang's warning to the government | मी पाणी बंद केलं, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मी पाणी बंद केलं, आता आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

जालना : सरकार आंदोलकांवर खोट्या केसेस दाखल करीत आहे. त्यामुळे सरकार विषयी रोष निर्माण झाला आहे. विनाकारण अधिकाऱ्यांनी त्रास दिला तर तुम्हीही कोर्टामार्फत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. मी आजपासून पाणी बंद केलं असून, आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाच्या आठव्या दिवशी बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. परंतु, सरकार खोट्या केसेस दाखल करीत आहे. केसेसला घाबरून आरक्षणाच्या लढ्यातून मागे सरकू नये. आरक्षणासाठी सर्व पुरावे आहेत. तरीही जाणून बुजून आरक्षण दिले जात नाही. आता आम्हाला लढावे लागेल. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल. आम्ही आरक्षणासाठी शांततेत लढा देणार आहोत. सरकारने वातावरण दूषित करू नये. आता माझे बोलणे कधी बंद होईल, हेच मला माहिती नाही. त्यामुळे शासनाने वेळ कशासाठी हवा, किती हवा, सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का हे इथं येवून सांगावे. आम्हाला त्यांचे म्हणणे योग्य वाटले तर आम्ही वेळ देवू अन्यथा एक तासही देणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

सहा ते सात टप्प्यात आंदोलन
मराठा आरक्षणाचा लढा शांततेत लढायचा आहे. एकूण सहा ते सात टप्प्यात आपले आंदोलन होणार आहे. शेवटच्या टप्प्यापूर्वीच आपल्याला आरक्षण मिळेल. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नयेत. उद्रेक करू नये, शांततेत आंदोलन करावे, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले.

Web Title: I stopped drink water, now I will not withdraw until get reservation; Manoj Jarang's warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.